जालना - छपरा रेल्वेसाठी सकल जैन समाजाचे निवेदन...!
...तर सात जिल्ह्यांतील जैन बांधव करतील आंदोलन
हिंगोली
प्रारंभी पूर्णा - अकोला मार्गे जाहिर करण्यात आलेली जालना - छपरा रेल्वे मनमाड मार्गे वळविण्यात आल्याने मराठवाड्यातील नाराज जैन बांधव आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. याबाबत शुक्रवारी सकल जैन समाजच्या वतीने जिल्हाधिकार्यांमार्फत केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
हिंगोली जिल्ह्यातील सकल जैन समाजाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन शुक्रवारी जिल्हाधिकार्यांना याबाबत एक निवेदन दिले आहे. निवेदनात नमुद आहे की, या रेल्वे मार्गावर कुंडलपूर, दामोह, द्रोणगिरी, हिरापूर, रेषन्दीगिरी, तरणतारण आदी जैन धर्माची तीर्थस्थळे आहेत. या धार्मिक स्थळांना मराठवाड्यातील परभणी, नांदेड, हिंगोली व विदर्भातील वाशिम, अकोला व बुलढाणा या जिल्ह्यांना जोडणारी एकही रेल्वे चालत नाही. या सहा जिल्ह्यांतील जैन धर्मीयांच्या भावना लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने जालना - छपरा ही रेल्वे परभणी, पूर्णा, हिंगोली, वाशिम, अकोला या रेल्वेमार्गावरून चालवावी. ही मागणी मान्य न झाल्यास हिंगोली जिल्हा रेल्वे संघर्ष समितीतर्फे २३ नोव्हेंबर रोजी केल्या जाणार्या जिल्हा बंद व रेल्वे रोको आंदोलनात जिल्ह्यातील समस्त जैन समाजाचे कार्यकर्ते सहभागी होतील, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदनावर प्रकाशचंद सोनी,
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण , प्रविण सोनी, मिलिंद यंबल, वंदना सोवितकर, गजकुमारी रवणे, ममता काळे, अशोक बडेरा, सुरेशचंद संचेती, अतुल बुर्से, मधुकर भाकळे, स्वप्निल सोवितकर, जयकुमार झांझरी, अतिश महाजन, सुरेंद्र हिरप, बालाजी उखळकर, डॉ. बोराळकर, सज्जन राऊत, ओंकार लांजनकर, सुदर्शन संघई, बंन्सीलाल अक्करबोटे, बाबुराव नवले, तेजकुमार झांझरी, अभिनंदन महाजन, बालाजी त्यारळ, सुभाषचंद सोनी, पारसमल जैन, भावनेश यंबल, आदिनाथ आंबेकर, दिपक सावजी, संजय साकळे, राजकुमार बडजाते, प्रविणकुमार झांझरी, कुलदिप मास्ट राहुल मैने आदींच्या स्वाक्षर्या आहेत.
टिप्पणी पोस्ट करा