आ. संतोष बांगर यांच्या पाठपुराव्यामुळे कळमनुरी विधासभा मतदार संघात सिंचनासाठी ३७ कोटी ५० लक्ष रुपयांच्या ३४ बंधाऱ्यांना मिळाली मंजुरी

*आ. संतोष बांगर  यांच्या पाठपुराव्यामुळे कळमनुरी विधासभा मतदार संघात सिंचनासाठी ३७ कोटी ५० लक्ष रुपयांच्या ३४  बंधाऱ्यांना मिळाली मंजुरी...

महाराष्ट्र 24 न्यूज 
नेटवर्क9 नोव्हेंबर 2022
हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर यांनी राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ भाई शिंदे  यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे कळमनुरी विधानसभा मतदार संघात शेती सिंचनासाठी मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने ३७ कोटी ५० लक्ष रुपये खर्चाच्या ३४ बंधाऱ्यांना मान्यता मिळाली असून पुढील काही दिवसांतच बंधाऱ्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे शेती सिंचनाचा प्रश्‍न काही प्रमाणात का होईना मार्गी लागणार आहे.
*कळमनुरी विधानसभा मतदार संघात शेती सिंचनासाठी बंधाऱ्याची आवश्‍यकता होती. नदी, नाल्यांचेे पाणी साठवून न राहता वाहून जात असल्याने त्याचा उपयोग होत नव्हता. त्यामुळे नदी, नाल्यांवर बंधारे घेऊन शेती सिंचनाचा प्रश्‍न मार्गी लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी आमदार संतोष बांगर यांच्याकडे केली होती.*
*दरम्यान शेतकऱ्यांचा प्रश्‍न लक्षात घेऊन आमदार बांगर यांनी मृद व जलसंधारण विभागामार्फत बंधाऱ्यांच्या कामांचे प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी पाठविले होते. त्यानंतर आमदार बांगर यांनी माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे पाठपुरावा करून या कामांना मान्यता मिळवून घेतली आहे.यामध्ये कोल्हापूरी बंधारे व साठवण बंधाऱ्याच्या कामांचा समावेश आहे.या बंधाऱ्यांच्या कामांना लवकरच सुरवात केली जाणार असून कोल्हापूरी व साठवण बंधाऱ्यांमुळे परिसरातील पाणी पातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे.* *बंधाऱ्याच्या परिसरामध्ये विहिरी व कृषी पंपांना फायदा होणार आहे. शिवाय शेती सिंचनाचा प्रश्‍नही मार्गी लागणार आहे. यासोबतच उन्हाळ्यामध्ये जनावरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लागणार असल्यामुळे शेतकऱ्यांसह पशुपालकांनी आमदार संतोष बांगर यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने