हिंगोली जिल्ह्यात गावठी हातभटटी दारू विक्रीचे चे सतत गुन्हे करणा-या विरूध्द मा. जिल्हाधिकारी
पोलीस अधीक्षक यांची कडक कार्यवाही
मा. जिल्हाधिकारी यांनी एम.पी.डी.ए. कायदान्वये काढले १ वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश
मा. पोलीस अधीक्षक हिंगोली श्री. जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्हयाचा पदभार स्विकारताच जिल्हयातील सराईत गुन्हेगार व अवैध्द धंदे चालविणा-या विरूद्ध कडक कार्यवाहीची भुमिका घेवुन असे गुन्हे सतत करणा-यां विरूध्द प्रभावी प्रतिबंधक कार्यवाही केली जात आहे.
त्यानुसारच मागील अनेक वर्षापासुन नामे— संदीप गोविंद पवार वय ३२ वर्ष रा. येहळेगाव तु. ता.कळमनुरी जि.हिंगोली हे परीसरात सतत गावठी हातभटटी दारूची निमिर्ती व विकी करणे तसेच त्यांच्यावर यापुर्वी पोलीस स्टेशन आखाडा बाळापुर येथे दारूचे १० पेक्षा अधिक गुन्हे दाखल असून पोलीसांनी वेळोवळी कार्यवाही करून तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ९३ अन्वये ०२ वेळेस प्रतिबंधक कार्यवाही व यापुर्वी एका वेळेस कलम ५६ महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये हृददपारीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता त्यानंतही नमुद इसमाचे कृत्यात कुठलेही बदल दिसुन येत नसुन परत ते माणवी शरीरास हानीकारक असे इथाईल अल्कोहोलचे मिश्रण असलेले हातभटटी दारूची निर्मीती व विक्री करीतच असुन त्यांचेवर पोलीस व कार्यकारी दंडाधिकारी यांचेकडुन केले गेलेल्या प्रतिबंधक कार्यवाहीस ते जुमानत नसुन ते गावठी हातभटटी दारू विकी करणे सारखे गुन्हे परत परत करत असुन असे गुन्हे करणारे सराईत हातभटटीवाले बनलेले आहेत
करीता सदर प्रकरणी सहा. पोलीस निरीक्षक पो.स्टे. बाळापुर यांनी नमुद इसमा विरूध्द महाराष्ट्र झोपडपटटी, हातभटटीवाले, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कालवकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणा-या व्यक्ती ( व्हिडीओ पायरेट्स) वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणा-या व्यक्ती हयांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्या बाबतचा अधिनियम १९८१ ( एम.पी.डी.ए.) अंतर्गत कार्यवाही बाबत प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्तावाची तपासणी उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग वसमत श्री. किशोर कांबळे यांनी करून प्रस्ताव मा. पोलीस अधीक्षक साहेब हिंगोली श्री. जी. श्रीधर यांनी सदरचा प्रस्ताव मा. जिल्हाधिकारी हिंगोली यांचेकडे पाठविला होता.
आज रोजी मा. जिल्हाधिकारी हिंगोली श्री. जितेंद्र पापळकर यांनी सदर प्रस्तावाची संपुर्ण सविस्तर पडताळणी करून नमुद ईसम नामे- संदीप गोविंद पवार वय ३२ वर्ष रा. येहळेगाव तु. ता. कळमनुरी जि. हिंगोली हा एक सवयीचा हातभटटीवाला म्हणुन सिध्द करून सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधक ठरेल अशा प्रकारची कृत्ये करीत आहे. व तो एम.पी.डी.ए. कायदयानुसार हातभटटीवाला बनला आहे म्हणुन त्यास एम.पी.डी.ए. कायदा १९८१ अन्वये ०१ वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश निर्गमीत केले आहेत.
टिप्पणी पोस्ट करा