पोषण ट्रॅकर ॲपमध्ये नोंदी घेण्यात हिंगोली अव्वल उद्या मान्यवरांच्या हस्ते होणार सत्कार
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
28 मार्च 2023
राज्यात अंगणवाडीच्या बालकांसाठी तयार केलेल्या पोषण आहार ट्रॅकमध्ये नोंदी घेण्यात हिंगोली जिल्हा राज्यात तिसरा असून, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा २९ मार्च रोजी मुंबईत सत्कार होणार आहे.
अंगणवाड्यांतून बालकांना पोषण आहार दिला जातो. तसेच त्यांचे वजन, स्थानी आहे. उंची व इतर बाबींची नोंद घेतली जाते. पूर्वप्राथमिक शिक्षणाचे धडे देतानाच त्यांचे कुपोषण होणार नाही, याची दक्षता घेतली जाते. ही सर्व माहिती भरण्यासाठी आता ऑनलाईन पोषण आहे.
ट्रॅकर अॅप तयार करण्यात आले आहे. यावर भरलेल्या माहितीच्या आधारे बालक कुपोषित असल्यास त्यावर उपाययोजनांची योजना तयार करण्यात येते. हिंगोली जिल्ह्याने ९६ टक्के काम Trac करून यात तिसरा क्रमांक पटकावला आहे, तर भंडारा अव्वल असून, पालघर दुसऱ्या
क्रमांकावर आहे
यासाठी २९ रोजी मुंबईत मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने व उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ यांचा सत्कार करण्यात येणार
टिप्पणी पोस्ट करा