हिंगोली शहरातील रस्त्यासाठी ८८ कोटी रुपयांचा निधी
आ. तानाजी मुटकुळे
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
शुक्रवार31मार्च2023
हिंगोली शहरातील अनेक प्रभागामधील
रस्त्यांची दुरावस्था भुमिगत गटार योजनेच्या कामामुळे झाल्यानंतर पहिल्या टप्यात १०१ कोटी रुपयाचा निधी प्राप्त झाला होता. त्यामध्ये रस्त्यांची कामे केली असून उर्वरित रस्त्यांच्या कामाकरिता टप्पा क्र. २ मध्ये ८८ कोटी रुपयाचा निधी मिळणार असल्याची माहिती आमदार तान्हाजीराव मुटकुळे यांनी पत्रकार परिषद मध्ये दिली
या संदर्भात आ. तान्हाजीराव मुटकुळे यांनी हिंगोली शहरामध्ये रस्त्यांची दुरावस्था झाली असल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. तसेच वाहन चालकांनाही तारेवरची कसरत करून वाहने चालवावी लागत होती. अशा परिस्थितीत रस्त्यांच्या कामाकरिता निधीची मागणी केली असता तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात १०१
हिंगोलीत रस्त्यांच्या कामासाठी यापूर्वी टप्पा क्र. १ मध्ये मिळाला होता १०१ कोटी रुपयाचा निधी
कोटी रुपयाचा निधी प्राप्त झाला असता सदर निधीतून शहरातील अनेक ठिकाणची रस्त्यांची कामे करण्यात आली. काही भागामध्ये रस्त्याची दुरावस्था कायम असल्याने उर्वरित निधी करिता शासन दरबारी पाठपुरावा केल्यानंतर आता टप्पा क्र. २ मध्ये लवकरच ८८ कोटी रुपयाचा निधी मिळणार असून त्या कामाची निविदा लवकरच काढली जाणार असल्याची माहिती आ. तान्हाजीराव मुटकुळे यांनी दिली. या रस्त्याची दर्जेदार कामे केली जाणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा