हिंगोली पोलिस दलातील२१ रिक्त पदासाठी २१९ उमेदवारांची २ एप्रिलला लेखी परिक्षा

जिल्हा पोलिस दलातील २१९ उमेदवारांची २ एप्रिलला लेखी परिक्षा

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
30 मार्च 2023 

हिंगोली जिल्हा पोलिस दलाच्या २१ रिक्त जागांसाठी मैदानी चाचणी सन २०२१ मध्ये घेण्यात आली होती. त्यामध्ये २१९ उमेदवार लेखी परिक्षेसाठी पात्र ठरले होते. या पात्र उमेदवारांची २ एप्रिलला लेखी परिक्षा होणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक जी श्रीधर यांनी दिली आहे.
सन २०२१ पोलिस शिपाई भरतीमध्ये पोलिस शिपाई पदासाठी लेखी परिक्षेस पात्र ठरलेल्या २१९ उमेदवारांची २ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजता परिक्षा होणार आहे. पोलिस शिपाई पदासाठी हिंगोली घटकांत

नवीन पोलिस वसाहतीमधील कम्युनिटी हॉलमध्ये लेखी परिक्षा

लेखी परिक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांना लेखी परिक्षेचे प्रवेशपत्र हे महाआयटी विभागामार्फत ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करता येणार आहे. लेखी परिक्षेसाठी परिक्षा केंद्रावर उमेदवारांनी दोन तास अगोदर पोहचणे आवश्यक आहे. हिंगोली घटकासाठी लेखी परिक्षेचे आयोजन कम्युनिटी हॉल, नवीन पोलिस वसाहत, नांदेड रोड हिंगोली  येथे घेण्यात येणार आहेत

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने