कनेरगावात उन्हाच्या फटक्याने पाच वर्षीय बालकाचा मृत्यू

  कनेरगावात उन्हाच्या फटक्याने पाच वर्षीय   बालकाचा मृत्यू 


महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
13 एप्रिल 2023 
हिंगोली तालुक्यातील कनेरगाव नाका व आजूबाजूच्या परिसरात गेली काही दिवस उन्हाचा पारा चढल्याने लहान मुलांमध्ये तसेच मोठ्या माणसांमध्ये ताप ,अंगदुखी, सर्दी ,उलट्या ,खोकला,संडास आदी करून थकवा कमजोरी याचे प्रमाण वाढले आहे .अशातच दिनांक ११ एप्रिल २०२३ रोजी नंदिनी शंकर खंदारे वय वर्ष ५ या लहान मुलीला सकाळी ९ वाजता दरम्यान उलटी संडास होऊन तपेचा झटका आला अचानक ताप वाढल्याने तिच्या डोक्यामध्ये ताप गेली असे खाजगी डॉक्टरांचे सांगितले होते  
 नंदिनीला लगेचच वाशिम येथे हलवले परंतु दिवसभर तिच्यावर उपचार करून  सुद्धा नंदिनीला आराम मिळाला नाही व संध्याकाळी पाचच्या दरम्यान डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले .नंदिनीला मृत घोषित केल्यानंतर कनेरगाव नाका व खंदारे हिच्या घरच्या मंडळींवर शोककळा पसरली .कनेरगावातील डॉक्टरांनी परिसरातील व गावातील लोकांना उन्हामध्ये बाहेर न निघण्याचे आव्हान केले आहे  दुपारी बारा ते चार उन्हाचा पारा खूप चढत आहे त्यामध्ये नागरिकांनी घराबाहेर पडताना डोक्याला रुमाल बांधून महत्वाचे काम असेल तरच
घराच्या बाहेर पडा      
                उन्हामध्ये शरीरातील पाणी कमी होते व थकवा -कमजोरी  जाणवते, हे होऊ न देण्याकरिता शरीरामधील पाणी कमी होऊ देऊ नये. आपण दिवसातून कमीत कमी सहा ते सात लिटर पाणी प्यावे व उन्हामध्ये जाण्याचे नागरिकांनी टाळावे 
महाराष्ट्र बोलताना डॉक्टर 
 कृष्णा गावंडे    यांनी सांगितले    
                सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याकारणाने आपण शक्यतो आपले कामे बाराच्या आत व चारच्या नंतर करावे. परंतु जेणेकरून अति आवश्यक काम असेल तर कानाला -डोक्याला रुमाल बांधावा व लिंबू शरबत, साखर -मीठ -पाणी याचे जास्तीत जास्त सेवन करावे  सध्या जिल्ह्यात तापमान जास्त असल्यामुळे  
नागरिकांनी  स्वतःची काळजी घ्यावी  ठेवावा .
असे डॉ. दीपक ठाकरे यांनी 
नागरिकांना आवाहन केले आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने