डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव निमित्ताने हिंगोली जिल्ह्यात तगडा पोलीस बंदोबस्तडीजेच्या वापरावर प्रतिबंध सायबर सेलचे पथकही सक्रिय

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव निमित्ताने  हिंगोली जिल्ह्यात 
 तगडा पोलीस  बंदोबस्त

डीजेच्या वापरावर प्रतिबंध सायबर सेलचे पथकही सक्रिय

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
 गुरुवार 13 एप्रिल 2023

 हिंगोली : जिल्हाभरात १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात येते. यानिमित्त पोलिस प्रशासनाने तगडा बंदोबस्त ठेवला आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी दिला आहे.

जिल्हाभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात येते. यानिमित्त विविध कार्यक्रम, मिरवणुकाही काढण्यात येतात. जयंती उत्सव काळात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिस प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक पोलिस ठाणे हद्दीतील मोठ्या गावात शांतता समितीच्या बैठकाही घेण्यात आल्या. मोठ्या शहरात दंगा नियंत्रण सराव व पथसंचलनही घेण्यात आले. यानिमित्त आता तगडा बंदोबस्त ठेवला जाणार आहे.

सोशल मीडियावरील हालचाली टिपणार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर, फोटो, व्हिडीओ टाकल्याचे

आढळल्यास थेट गुन्हा दाखल केला जाणार आहे.

 यासाठी पोलिस अधीक्षक कार्यालयात सायबर सेल पथक कार्यन्वित करण्यात आले असून, हे पथक सोशल मीडियावर लक्ष ठेवून असणार आहे. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर जपून करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

डीजेचा वापर टाळावा

जयंती उत्सवात प्रतिबंधित ध्वनिक्षेपक (डीजे) चा वापर कोणीही करू नये, मागील दहा दिवसांत विविध उत्सव, मिरवणुकीत मयदिपेक्षा अधिक आवाज करून डीजेचा वापर केल्याप्रकरणी हिंगोली शहर, वसमत शहर, औंढा ना., कुरुंदा पोलिस ठाण्यात आयोजक व डीजे चालकांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन, पोलिस विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या 
यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांच्यासह १ उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक असे ६७ समावेश आहे.

पोलिस अधिकारी तसेच ५५२ पोलिस अमलदार २ एस आर पी एफ कंपनी २ आरसीपी  पथक२ बीडीएस पथक १ एटीबी पथक 600 होमगडांचा समावेश आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने