हिंगणी येथील भिम जयंतीला हायकोर्टाकडुन परवानगी

हिंगणी येथील भिम जयंतीला हायकोर्टाकडुन परवानगी
सामाजिक कार्यकर्ते किरण घोंगडे

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
 बुधवार26 एप्रिल 2023

हिंगोली तालुक्यातील हिंगणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने २५ एप्रिल रोजी परवानगी देऊ केली आहे. त्यामुळे जयंती साजरी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

हिंगोली तालुक्यातील हिंगणे येथे दरवर्षी २९ एप्रिल या दिवशी भीम जयंती साजरी करण्यात येते. गेल्या २ वर्षांपासून होत असलेल्या या भीम जयंतीला यावर्षी मात्र पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली होती. त्यामुळे हिंगणी येथील राजकुमार सरतापे, अनिताबाई सरतापे, गौतम सरतापे यांच्या वतीने औरंगाबाद येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. न्या. मंगेश पाटील आणि न्या. अभय वाघवसे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांतर्फे बाजू मांडणारे अॅड. उत्तम तेलगावकर यांनी दिलेल्या माहिती नुसार न्यायालयाने परवानगी दिली आहे, परंतु आदेशाची प्रत प्राप्त झाल्यावरच कळेल की, ही परवानगी काही अटी-शर्तीवर दिली आहे का. त्यानंतरच पुढील दिशा ठरेल असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

हिंगणीत 
हजारोच्या संख्येने डॉ बाबासाहेब यांची जयंती साजरी करणार  सामाजिक कार्यकर्ते किरण घोंगडे 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने