सवना येथे राशन कार्डधारकांचा रास्ता रोको आंदोलन वाहतूक ठप्प, पोलिसांनी ठेवला चोख बंदोबस्त.
महाराष्ट्र 24न्यूज नेटवर्क
11एप्रिल 2023
हिंगोली तालुक्यातील सवना येथील रेशन कार्ड लाभधारक कुटुंबातील सदस्यांची ऑनलाइन प्रणालीमध्ये नावे समाविष्ट करण्यासाठी सोमवारी सवना येथे ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या त्यामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णतः कोलमडली होती. रास्ता रोको दरम्यान पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.सवना येथील नागरिकांनी दिनांक 7 मार्च 2023 रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी व तहसीलदारांना या संदर्भात निवेदन दिले होते या निवेदनावर जवळपास 400 लाभार्थ्यांची ऑनलाईन प्रणालीमध्ये नावे समाविष्ट करण्यासाठी सांगितले होते परंतु जिल्हा पुरवठा विभागाने ऑनलाइन प्रणालीमध्ये लाभार्थ्यांची नावे समाविष्ट केली नाहीत त्यामुळे ग्रामस्थांनी 10 एप्रिल 2023 सोमवार रोजी सवना ता. सेनगाव येथील मुख्य रस्त्यावर सकाळी 10 वाजेपासून 11:30 वाजेपर्यंत ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले दरम्यान ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केल्याचे कळताच नायब तहसीलदार गायकवाड सर यांनी आंदोलनाकर्त्यांची भेट घेऊन 18 एप्रिल पर्यंत लाभार्थ्यांची नावे ऑनलाइन प्रणालीमध्ये समाविष्ट केले जातील अशी लेखी आश्वासन दिले तसेच आनंदाचा शिधा पोहोचला नसल्यामुळे तो ही तात्काळ पाठविला जाईल असेही सांगितले या आंदोलनात अँड. विजय राऊत ,विजय वानखेडे, संदीप वानखेडे, अँड. प्रवीण नायक, गजानन बांगर ,कैलास भालेराव, मधुकर नायक, केशव नायक, एकनाथ वानखेडे ,प्रवीण चव्हाण आदीसह सवना येथील ग्रामस्थांनी सहभाग नोंदविला. दरम्यान रास्ता रोको आंदोलनाच्या वेळी पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्तत ठेवण्यात आला होता. 7 मार्च रोजी सवना नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते आणि जर नावे समाविष्ट नाही केली तर 10 तारखेला आंदोलन करण्यात येणार असे सवना नागरिकांतर्फे अँड. विजय राऊत यांनी सांगितले होते. परंतु तहसीलदार यांची बदली असल्याकारणाने ऑनलाइन मशीन बंद होती त्या कारणांनी त्यांची नावे समाविष्ट करण्यात आली नाही म्हणून आंदोलन करण्यात आले होते.
टिप्पणी पोस्ट करा