रेल्वे पटरीवर झोपलेल्या मूकबधिराचे देवदूत पोलिसांनी वाचविले प्राण

रेल्वे पटरीवर झोपलेल्या मूकबधिराचे देवदूत पोलिसांनी वाचविले प्राण

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
 रविवार 9 एप्रिल 2023  
 हिंगोली : सायंकाळी चार ते साडेचारची वेळ. एक मूकबधिर युवक खटकाळी रेल्वे उड्डाणपुलानजीक रेल्वे पटरीवर झोपला होता
अनेक नागरिकांनी 
 आवाज दिला, हातवारे केले मात्र प्रतिसाद  देत नव्हता 
दरम्यान  रेल्वे येण्याच्या आधीच
पोलिस व रेल्वे गेटवरील कर्मचारी धावले गेले 
अन् त्याला रेल्वे पटरी वरून बाजूला  केले व सुखरूप घरीही सोडले.
हिंगोली नजीकच्या पुष्प कॉलनी भागातील तुकाराम कुंडलिक मुकाडे हा युवक घरातून नेहमीप्रमाणे बाहेर पडला. मात्र, तो थेट रेल्वे पटरीवरच येऊन झोपला. पॅसेंजर रेल्वेला काही वेळ हा युवक पटरीवर झोपल्याचे पाहून पोलिस कर्मचारी हिंगोली पोलीस दलातील वाहतूक शाखेचे पोलीस  वसंता चव्हाण यांनी आवाज दिला. हातवारे केले. मात्र त्याने काहीच प्रतिसाद दिला नाही. शेवटी रेल्वेगेट कर्मचाऱ्यांसमवेत ते
त्याच्याकडे गेले. 
तर त्याला बोलताही येत नसल्याचे व ऐकूही येत नसल्याचे कळाले. त्याच्याकडे एक बंद अवस्थेतील मोबाइल होता. झडतीत खिशांत आधार कार्ड आढळले. त्यावरून त्याचे नाव व पत्ता कळाला. एक मोबाइल क्रमांकही मिळाला. तो पुष्प कॉलनीतील असल्याचे समोर आले. 
त्यानंतर  वसंता चव्हाण यांच्यासह शेषराव चव्हाण, विलास सोनवणे, किरण चव्हाण, संदीप खरबळ यांनी त्याला घरी नेऊन सोडले. त्यांची आजी व आई यांच्या स्वाधीन केले.

रेल्वे गेट जवळ मोठ्या प्रमाणात बघायची गर्दी होती मात्र शेवटी पोलीसच देवदूत म्हणून धावून गेल्याने मूकबधिराचा जीव वाचला

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने