कनेरगाव नाका येथे पोहोचला आनंदाचा शिधा.
लाभार्थ्यामध्ये आनंदाचे वातावरण
सोमवार 10 एप्रिल 2023
कनेरगाव नाका : शासनाच्या आनंदाचा शिधा या योजनेअंतर्गत अखेर कनेरगाव नाका येथे स्वस्त धान्य दुकानात शिधा किट उपलब्ध झाले असून शनिवारी स्वस्त धान्य दुकानदार यांनी पात्र लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा सरपंच महोदय यांचे पती गणेश गावंडे यांच्या हस्ते शिधा किट चे वितरित करण्यात आले राज्य शासनाने दिवाळीप्रमाणे गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शंभर रुपयात आनंदाचा शिधा वितरित करण्याची घोषणा केली होती तथापि गुढीपाडव्याला पात्र लाभार्थ्यापर्यंत आनंदाचा शिधा पोहोचू शकला नाही.
आता कनेरगाव नाका व परिसरातील गावात आनंदाचा शिधा पात्र लाभार्थी संख्येनुसार किट उपलब्ध झाले असून या योजनेअंतर्गत कनेरगाव नाका येथील ६६३ लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा या उपक्रमाचा लाभ मिळाला. त्यामध्ये शेतकरी लाभार्थी ,अंत्योदय लाभार्थी, दारिद्र रेशेखालील लाभार्थी यांना सुद्धा लाभ मिळाला. सगळीकडे पात्र लाभार्थ्यांना या किटचे वितरण सुरू करण्यात आले. स्वस्त धान्य दुकानदार रामहरी पाटील भालेराव यांनी गणेश गावंडे यांच्या हस्ते सीधा किट वितरित केले यावेळी पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला.
टिप्पणी पोस्ट करा