हिंगोलीत कृषी विभागात नोकरीचे बनावट आदेश देवुन ३४ लाखांची फसवणुक
महाराष्ट्र 24 न्युज नेटवर्क
गुरुवार 25मे2023
हिंगोली : शहराजवळील बळसोंड अंतुले नगर भागातील एका आरोग्य सेवकाच्या पुतणीस व इतरांना कृषी विभागात नोकरीस लावण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडुन ३४ लाख रुपये घेवुन त्यांना बनावट नियुक्ती पत्र दिल्याने हिंगोली ग्रामीण पोलीसात तिघांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, हिंगोली शहराजवळील अंतुले नगर भागातील गजानन तुकाराम गायकवाड या आरोग्य सेवकाची पुतणी अश्विनी गायकवाड हिस कृषी विभागात नोकरीस लावण्याचे आमिष दाखवुन त्यांच्याकडुन २१ लाख रुपये सचिन मधुकर चेके रा. मंगरुळपिर जि. वाशिम अरुण श्रीराम ठाकरे रा. येराळा जि. वाशिम ह. मु. कनेरगाव नाका, गोवर्धन गावंडे रा. कनेरगाव नाका या तिघांनी घेतले. तसेच गजानन गायकवाड यांचे पाहुणे रामेश्वर गांदेकर याच्याकडुन त्यांची पत्नी स्वाती वाणी हिच्या नोकरीसाठी १३ लाख रुपये असे ३४ लाख रुपये या तिघांनी १ एप्रिल ते ९ जुन २०२१ या दरम्यानच्या कालावधीत घेतले. त्यानंतर लवकरच येत्या काही दिवसात तुमच्या नोकरीचे काम होईल असे मुपडे हे करीत आहेत.
हिंगोली ग्रामीण पोलीसात तिघांविरुध्द गुन्हा दाखल
या तिघांकडुन सांगितले जात होते. दरम्यानच्या कालावधीत त्यांनी हिंगोली येथील जिल्हा अधिक्षक कृषी विभागात कामावर रुजू होण्याचे आदेश दिले असता गायकवाड यांचे पाहुणे कार्यालयात रुजू होण्यासाठी गेले असता याठिकाणी कोणत्याही प्रकारची भरती झाली नसुन भरतीबाबत जाहिरातही दिली नसल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सांगताच गायकवाड यांच्या पायाखालची जमिन घसरली. त्यांना आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पैसे मागण्याकरीता तगादा लावला. परंतु त्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने २३ मे रोजी रात्रीच्या सुमारास हिंगोली ग्रामीण पोलीसात गजानन गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सचिन मधुकर चेके रा. मंगरुळपिर जि. वाशिम, अरुण श्रीराम ठाकरे रा. येराळा जि. वाशिम ह.मु. कनेरगाव नाका, गोवर्धन गावंडे रा. कनेरगाव नाका या तिघांवर फसवणुकीसह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार शिवाजी गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुपडे करत आहेत
टिप्पणी पोस्ट करा