महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
मंगळवार2 मे 2023
समाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या योजना उत्कृष्ठ रितीने राबविल्या बद्दल मा . एस.के. मिणगीरे - सहा. आयुक्त , हिंगोली यांचा मा .ना. श्री अब्दूल सत्तार - कृषी मंत्री तथा पालकमंत्री हिंगोली यांच्या हस्ते विशेष सत्कार व सामाजिक न्याय समता पर्व समारोप तसेच यशोगाथा या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने जिल्ह्यात 01 एप्रिल 2023 ते 01 मे 2023 महाराष्ट्र दिन कालावधीत "भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता पर्व" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्याचाच एक भाग म्हणून दिनांक 01 मे 2023 वार सोमवार रोजी मा.ना. श्री.अब्दुल सत्तार- कृषी तथा पालकमंत्री हिंगोली यांचे हस्ते समाजिक न्याय समता पर्वाचे समारोप करण्यात येवनु समाजिक न्याय विभागाच्या वतीने यशोगाथा पुस्तिकेचे प्रकाशन तसचे समाजिक न्याय समता पर्व पुस्तिकेचे अनावरन करण्यात आले.
तसेच सदर कार्यक्रमामध्ये समाजिक न्याय विभागाव्दारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेंचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी कार्यतत्पर असे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणुन श्री.शिवानंद मिनगीरे-सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण हिंगोली यांचा मा.ना. श्री.अब्दुल सत्तार- कृषी तथा पालकमंत्री हिंगोली यांनी सत्कार केला.
टिप्पणी पोस्ट करा