हिंगोली उपविभागीय अधिकाऱ्यांनी लावलेला २ लाख १४ हजाराचा दंड रद्द
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
मंगळवार 16 मे 2023
हिंगोली : तालुक्यातील केसापूर येथील अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी टिप्पर मालकावर उपविभागीय अधिकारी हिंगोली यांनी २ लाख १४ हजाराचा दंड आकारला होता. या विरूद्ध अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे अपिल करण्यात आला होता. या प्रकरणात उपविभागीय अधिकारी यांनी लावेलला दंड अप्पर जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात रद्द करण्यात आला आहे.
हिंगोली तालुक्यातील केसापुर येथील विजय श्रीपती बनसोडे यांचे टीप्पर वाहन क्र. एमएच ३८ एच ९१७१ हे टीप्पर पोलीस अधिकाऱ्यांनी पकडले होते. सदरील टीप्पर मालका विरुध्द गौण चोरीच्या आरोपावरुन उपविभागीय अधिकारी हिंगोली यांनी १४ डिसेंबर २०२२ रोजी २ लाख १४ हजार ३५५ रुपयाचा दंड ठोठावला होता. विजय श्रीपती बनसोडे यांनी अॅड. अजय उर्फ बंटी पंडीतराव देशमुख यांच्या मार्फत अपर जिल्हाधिकारी हिंगोली यांच्या न्यायालयात अपिल केली होती. दोन्ही पक्षाचा युक्तीवाद
अवैध गौण खनिज चोरी प्रकरणातील टिप्पर मालकाला मिळाला दिलासा
ऐकुन अपर जिल्हाधिकारी हिंगोली खुशालसिंह परदेशी यांनी यांनी ४ मे २०२३ रोजी अपिलार्थीची अपिल मंजुर करुन वि. उपविभागीय अधिकारी हिंगोली यांनी टीप्पर मालका विरुध्द लावलेला २ लाख १४ हजार ३५५ रुपयाचा दंड लावलेला आदेश रद्द केला. अपिलार्थीच्या वतीने अॅड. सतीश देशमुख, अॅड. सौ. सुनीता देशमुख, अॅड. शामकांत देशमुख, अॅड. प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अॅड. अजय उर्फ बंटी पंडीतराव देशमुख यांनी काम पाहिले व युक्तीवाद केला. त्यांना अॅड. शरद देशमूख, अॅड. आदीत उर्फ शुभम सतीश देशमुख, अॅड. आरीफ पठाण, अॅड. राहूल देशमूख, अॅड. विराज देशमुख, अॅड. योगेश खिल्लारी (पाटील), अॅड. रजत देशमूख, अॅड. अविनाश राठोड, अॅड. प्रकाश मगरे, अॅड. आनंद खिल्लारे, अॅड. सुमीत सातव, अॅड. मुददसीर अ. रहीम, अॅड. लखन पठाडे, अॅड. श्रध्दा जैस्वाल, अॅड. आकाश चव्हाण, अॅड. शुभम मुदीराज यांनी सहकार्य केले.
टिप्पणी पोस्ट करा