महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
शनिवार 27 मे 2023
गेली ७ ते ८ वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न निकाली काढल्या बद्दल जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व सहा. आयुक्त शिवानंद मिणगिरे याचा दिशा समितीच्या बैठकीत अभिनंदनाचा ठराव मंजूर .
हिंगोली जिल्ह्यातील मौजे पिंपळदरी ता. कळमनूरी येथील सैन्या मध्ये असलेल्या जवानाचा कार्यरत असताना मृत्यू झाला त्यानंतर त्यांची वृद्ध आई ला जगण्याचा आधार म्हणूून सामाजिक न्याय विभागाकडून कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजनेतून ४ एकर शेती मोफत देण्यासाठी शासन स्थरावरून अट शिथील करून शिवानंद मिनगीरे यांनी स्वतः जमीन मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला व मागील 7 ते 8 वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावला त्याबद्दल दिशा समितीचे अध्यक्ष तथा मा. खासदार हेमंत पाटील यांनी जिल्हाधिकारी पापळकर व सहा आयुक्त शिवानंद, मिनगीरे या दोघांचेही अभिनंदन केले
दिशा बैठक मध्ये उपस्थित असलेले हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजी मुटकुळे व कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी तोंड भरून कौतुक केले
टिप्पणी पोस्ट करा