हिंगोली पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी अचानक गायब
तात्काळ कारवाई करा
मनसे जिल्हाप्रमुख बंडू कुठे
मंगळवार30मे2023
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
हिंगोली येथील पंचायत समिती कार्यालयाच्या दुरुस्तीचे काम मागील अनेक दिवसापासून कासव गतीने सुरू आहे
दरम्यान मात्र कार्यालय दुरुस्तीच्या नावाखाली अधिकारी, कर्मचारी गायब राहत असल्याचे महिती आहे ग्रामीण भागातून कामानिमित्त आलेले नागरिकही अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या प्रतीक्षेत पं.स. कार्यालयाच्या आवारात थांबले होते.
हिंगोली पंचायत समितींतर्गत १११
ग्रामपंचायतींचा कारभार चालतो. यामध्ये अनेक ग्रुप ग्रामपंचायती आहेत. घरकूल, सिंचन विहिरी, गोठा आदींसह विविध योजनांतर्गत ग्रामीण भागात कामे केली जातात. मध्यंतरी गटविकास अधिकाऱ्यांनी टक्केवारी न मिळाल्याने
मग्रारोहयोच्या कामावर टाकलेल्या बहिष्कारामुळे ती कामे ठप्प झाली होती. मागील आठ दिवसांपासून ही कामे सुरू झाली आहेत. परंतु, पंचायत समितीच्या अर्ध्या कार्यालयावर टिनपत्रे असून, काही खोल्या छताच्या आहेत. गेल्या वर्षी पावसाळ्यात या कार्यालयाला गळती लागली होती. त्यामुळे यंदा पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून
अनेक दिवसापासून हिंगोली पंचायत समिती भोंगळ कारभार
वरिष्ठ अधिकाऱ्यांना तात्काळ लक्ष द्यावे
इमारतीला नवे रूप देण्याचा प्रयत्न सुरू आहे. दुसरीकडे कार्यालय दुरुस्तीच्या नावाखाली अधिकारी, कर्मचारी मात्र गायब राहत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना अनेक वेळा दिवसभर प्रतीक्षा करूनही संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांची भेट होत नाही. अशा कामचुकर अधिकारी कर्मचाऱ्यावर वरिष्ठ अधिकाऱ्याकडून तात्काळ कारवाई करावी अशी मागणी मनसेचे जिल्हाप्रमुख बंडे कुठे यांनी वरिष्ठाकडे करणार असल्याची माहिती आहे
टिप्पणी पोस्ट करा