महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
04मे2023
दरबाराच्या माध्यमातुन मा. पोलीस अधीक्षक यांनी जाणुन घेतल्या अधिकारी अंमलदार यांच्या समस्या तात्काळ समाधान केल्याने पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे आनंद झाले द्वीगुणीत
पोलीस दलातील सेवा तशी कठोर परीश्रमाची सेवा समजली जाते. पोलीस म्हणुन समाजात काम करतांना दैनदीन कामाचा व्याप खुप जास्त व कामाचा ताण-तणाव असतो. पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांचे सेवेमध्ये त्यांचेकरीता सर्व सुविधा व त्यांचे असलेले अडी-अडचणींचे समाधान तात्काळ व सहज व्हावे याकरीता पोलीस दलातील सर्व वरीष्ठ अधिकारी सुध्दा नियमित प्रयत्न करीत असतात. समस्या / अडी-अडचणी नसतील तर पोलीस अधिकारी व अंमलदार अधिक कार्यक्षमपणे कर्तव्य करू शकतात.
म्हणुन पोलीस अधिकारी व अंमलदार यांना असलेल्या समस्या एकत्रीत जाणुन घेवुन त्यावर समाधानासाठी शक्य ते सर्व उपाय योजना करण्याच्या उददेशाने हिंगोली जिल्हयाचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक श्री. जी. श्रीधर यांनी जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेकरीता आज दिनांक-04/05/2023 रोली संत नामदेव पोलीस कवायत मैदान येथे दरबाराचे आयोजन केले होते. सदर दरबारात मा. पोलीस अधीक्षक श्री. जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विवेकानंद वाखारे, पोलीस निरीक्षक स्थागुशा श्री. पंडीत कच्छवे, कार्यालयीन अधीक्षक वसीम शेख ईतर पोलीस अधिकारी कार्यालयीन स्टाफ व सर्व पोलीस स्टेशन व शाखा मधील पुरूष व महीला पोलीस अंमलदार मोठया संख्येने हजर होते.
दरबारात मा. पोलीस अधीक्षक श्री. जी.श्रीधर यांनी सर्व उपस्थित अधिकारी व अंमलदार यांना त्यांचे समस्या अडी-अडचणीबाबत विचारून अधिकारी व अंमलदार यांने सांगीतलेल्या अडचणी प्रमाणे तात्काळ त्याबाबत पुढील उपाययोजना व कार्यवाही बाबत आदेश देवुन अधिकारी व अंमलदार यांनी मांडलेल्या समस्या / अडी-अडचणी पैकी अधिकाधिक समस्यांचे निराकरण तात्काळ केले. त्यामुळे संबंधीत अधिकारी व अंमलदार यांचे आनंद द्वीगुणीत झाले तर उपस्थित पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी त्यांचे समस्या / अडी-अडचणी जाणुन जाणुन घेवुन त्या सोडवण्यासाठी दरबाराचे आयोजन केले म्हणुन आनंद व समाधान व्यक्त केले.
टिप्पणी पोस्ट करा