क्रहाळे दिग्रस येथे विवाहित महिलेचा गळा आवळून खून
पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
रविवार 7मे 2023
हिंगोली तालुक्यातील क. दिग्रस येथील रात्री बाराच्या सुमारास नवरा बायको मध्ये शाब्दिक चकमक झाल्याने रागाच्या भरात नवऱ्याने बायकोचा गळा आवळून खून केल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे
सविस्तर माहिती अशी की वसमत तालुक्यातील सोन्ना हट्टा येथील सोपान जाधव यांनी
हिंगोली तालुक्यातील दिग्रस कराळे येथे 14 वर्षापूर्वी योगिता व संतोषचा विवाह केला होता
त्यांना दोन चीमकुले मुलगा मुलगी आहेत
6 मे रोजी रात्री नवरा बायकोची शाब्दिक चकमकीनंतर रागाच्या भरात नवऱ्याने पत्नी योगिताचा गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे
दरम्यान हिंगोली ग्रामीणचे
पोलीस उप निरीक्षक मगन पवार विकी कुंदनानी यांनी
घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी विवेकानंद वाखारे पोलीस निरीक्षक शिवाजी गुरमे यांनी पाहणी करून
आरोपीला तात्काळ ताब्यात घेण्याचे आदेश दिले
आरोपी संतोष यांनी
पत्नी योगिताचे हात पाय बांधून दोरीने गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे
पोलिसाकडून आरोपी ला ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू आहे
टिप्पणी पोस्ट करा