हिंगोली शहर पोलीस स्टेशन जिल्ह्यात आव्वल पोलीस निरीक्षक सोनाजी आम्ले यांचे कौतुक

हिंगोली शहर पोलीस स्टेशन जिल्ह्यात आव्वल पोलीस निरीक्षक सोनाजी आम्ले यांचे कौतुक 
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
सोमवार 8 मे 2023

 हिंगोली शहर, गोरेगाव व कुरूंदा यांना मा. पोलीस अधीक्षक साहेब यांचेकडुन प्रशस्तीपत्रक व बक्षीस जाहीर

मा. पोलीस अधीक्षक हिंगोली  जी.श्रीधर यांचे संकल्पनेतुन जिल्हयातील सर्वच पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हेगारी कमी करणे, प्रलंबित गुन्हे व तकार अर्ज प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करणे, लपुन छपुन सुरू असलेले अवैध्द धंदयावर कार्यवाही मोहीम तसेच जनता व पोलीस सुसंवाद अधिकाधीक वाढावा यासाठी विवीध उपक्रम राबविणे, सतर्क रात्रगस्त व कोम्बींग ऑपरेशन इ. माध्यमातुन चोरींच्या घटनांना आळा बसावा यासाठी प्रयत्न असे जिल्हयातील सर्व १३ हि पोलीस स्टेशनमध्ये वरील सर्व बाबी व ईतर प्रमुख बाबींनुसार प्रभावी कामगिरी व्हावी यासाठी मा. पोलीस अधीक्षक यांनी प्रत्येक महीण्यात सर्व १३ हि पोलीस स्टेशनचे कामगीरीचे मुल्यांकन करून व सर्वकंप बाबींचा आढावा घेवुन उत्कृष्ट कामगिरी करणारे टॉप ०३ पोलीस स्टेशनची निवड करून त्यांना प्रशस्तीपत्र व बक्षीस देण्याची योजना सुरू केली आहे.
सदर योजने नुसार माहे / एप्रील २०२३ या महीण्याच्या मासिक अहवालाचे व जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशनच्या कामगिरीचे अवलोकन व मुल्यांकन करून उत्कृष्ट कामगिरी करणारे टॉप ०३ पोलीस स्टेशनची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार सर्वाधिक गुण प्राप्त करून व उत्कृष्ट कामगिरी करून पोलीस स्टेशन हिंगोली शहर यांनी पहीला तर पोलीस स्टेशन गोरेगाव यांना द्वितीय व पोलीस स्टेशन कुरूंदा यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे. नमुद पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी हिंगोली शहर पोनि श्री. सोनाजी आम्ले यांना प्रथम क्रमांक बददल प्रशस्तीपत्रक व १८०० रू. रोख बक्षीस सोबत सी-नोट, द्वितीय क्रमांका बददल पो.स्टे. गोरेगाव चे प्रभारी अधिकारी श्री. रवि हुंडेकर यांना प्रशस्तीपत्रक व १५०० रू. रोख बक्षीस सोबत सी-नोट तर तृतीय क्रमांका बददल पो.स्टे. कुरूंदा चे प्रभारी अधिकारी सपोनि श्री. गजानन मोरे यांना प्रशस्तीपत्रक १२०० रु. रोख बक्षीस व सोबत सी-नोट असे बक्षीस मा. पोलीस अधीक्षक  यांचेकडुन जाहीर करण्यात आले आहे.

 तीनिही पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांचे जिल्हाभरात कौतुक होत आहे 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने