२१ बालकांवर होणार मुंबईत शस्त्रक्रिया
डॉ राजेंद्र सूर्यवंशी
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
17 मे 2023
राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील २१ बालकांवर मुंबईतील भायखळा येथील रुग्णालयात हृदय शस्त्रक्रिया होणार आहे. यासाठी १६ मे रोजी ही बालके हिंगोलीतून रवाना झाली.
आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी आणि शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती. या तपासणीदरम्यान ज्या बालकांना आरोग्याच्या समस्या आहेत. त्यांची पुन्हा तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. तसेच ज्यांना हृदयाची समस्या आहे,
अशा ३३ बालकांची २८ व २९ एप्रिल रोजी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्डियालॉजिस्ट मार्फत २ डी-इको तपासणी करण्यात आली होती. २१ बालकांना ट्रॅव्हल्सद्वारे १६ मे रोजी मुंबईकडे रवाना करण्यात आले. या बालकांवर भायखळा येथील रुग्णालयात हृदयाची शस्त्रक्रिया होणार आहे. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी, लक्ष्मण गाभणे, डॉ. चुक्केवार, डॉ. घुगे, डॉ. पेरके, डॉ. कैलास पवार, राहुल घुगे यांच्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
टिप्पणी पोस्ट करा