हिंगोलीत तोतया अभियंत्याला अटक बनावट सोने विक्री करणारे टोळीचा स्थागुशा कडुन पर्दाफाश

हिंगोलीत तोतया  अभियंत्याला अटक 
बनावट सोने विक्री करणारे टोळीचा स्थागुशा हिंगोली कडुन पर्दाफाश

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
सोमवार 05 जून 2023
हिंगोली जिल्हयामध्ये बनावट सोने विक्री करणारी टोळी वावरत असुन, हिंगोली शहारातील सराफा बाजारामध्ये बनावट सोने विक्रीचा प्रयत्न झाला आहे. तसेच गोल्ड लोन फायनान्स मध्ये सुध्दा बनावट सोने गहाण ठेवण्याचा प्रयत्न होत आहे. अशी माहिती मिळाल्यावरुन हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक श्री जी. श्रीधर यांनी सदर टोळीचा छडा लावण्याच्या सुचना पोनि श्री पंडीत कच्छवे स्थागुश यांना देवुन स्थागुशचे सपोनि शिवसांब घेवारे यांच्या नेतृत्वात एक विशेष पथक नेमण्यात आले होते.

आरोपीने महावितरणचा अभियंता असल्याचे भासवून  केली दिशाभुल 
दि. ०५.०६.२०२३ रोजी स्थागुशचे पोलीस पथकास गोपनिय माहिती मिळाली की, हिंगोली ते कळमनुरी जाणारे रोडवरील ऋषीकेश हॉटेल समोर बनावट सोने विक्री करणारा एक इसम सिल्हर रंगाची कार घेवुन उभा आहे. अशी माहिती मिळाल्या संदर्भाने पोलीस पथकाने सदर ठिकाणी जावुन छापा मारला असता सदर ठिकाणी कार क्र. एमएच ४६ एडी ५७९४ व संशयीत इसम नामे योगेश सुभाष इंगोले रा. लासीना ता. जि. हिंगोली हे मिळुन आले. पोलीस पथकाने सदर इसमास विचारपुस केली असता आरोपी योगेश याने त्याचा साथीदार संतोष देश्मुख यांनी मिळुन बनावट सोन्याच्या बांगडया हिंगोली येथील सराफा दुकान व गोल्ड लोन फायनान्स वर विक्री करुन गहाण ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगीतले. तसेच आरोपी योगेश इंगोले याने महावितरणचा इंजिनियर असल्याचे भासवुन, तसे वेगवेगळे बनावट ओळखपत्र बनवुन, स्वतःचे ताब्यातील खाजगी कारवर महाराष्ट्र शासन महावितरण नावाचे स्टीकर लावुन जनतेची दिशाभुल करत असल्याची कबुली दिली.
आरोपी योगेश इंगोले याच्याकडुन महावितरण अभियंता असल्याचे अनेक बनावट ओळखपत्र, कार, मोबाईल असा एकुण ३,२५,०००/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला असुन आरोपी योगेश इंगोले व संतोष देशमुख यांचे विरुध्द सपोनि शिवसांब घेवारे यांनी दिलेल्या फिर्याद वरुन पोस्टे कळमनुरी येथे फसवणुकीचा
 गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
वरील प्रकरणात 
 आरोपींची संख्या वाढण्याची दाट  शक्यता
वर्तवली जात आहे 
 कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री जी. श्रीधर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, श्री पंडीत कच्छवे पोनि स्थागुश हिंगोली यांचे मार्गदर्शनाखाली स्थागुशचे सपोनि शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार लिंबाजी वाव्हळे, गजानन पोकळे, ज्ञानेश्वर पायघन, विठ्ठल काळे, हरीभाऊ गुंजकर यांनी केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने