हिंगोली जिल्हा दुष्काळ जाहीर करा मुख्यमंत्र्यांना आमदाराचे निवेदन
महाराष्ट्र 24न्यूज नेटवर्क
09 नोव्हेंबर 2023
हिंगोली जिल्ह्यात यंदा अल्प व अवेळी पर्जन्यामुळे दुष्काळी परिस्थिती आहे. या भागातील प्रमुख पिके हातची गेली असून, शेतकऱ्यांना दुष्काळी मदतीची मागणी करणारे निवेदन आमदार संतोष बांगर व आमदार तानाजी मुटकुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केले.
हिंगोली जिल्ह्यात यंदा सोयाबीन पीक पावसाने ओढ दिल्याने आधीच वाया गेले असताना येलो मोझॅक हा रोग पडल्याने तर शेतकऱ्यांचे पूर्णतः नुकसान झाले आहे. त्यातच तुरीची व कापसाचीही स्थिती फारसी चांगली नाही. हळदीलाही पाणी कमी पडत असल्याने शेतकऱ्यांना फटका बसत आहे. यातच रब्बी हंगाम येईल इतका
ओलावाही जमिनीत नाही. खरीप पीक हातचे गेल्याने शेतकरी पुरता निराश उपसा झाला आहे. त्यामुळे दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी जिल्ह्यातील विदारक परिस्थितीचे कथनही आ. मुटकुळे व आ. बांगर यांनी शिंदे यांच्यासमोर केले, तर शेतकऱ्यांना
अत्यल्प उत्पादन झाल्याने तो मेटाकुटीला आला असून मदत न केल्यास कोलमडून पडण्याची भीती व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनीही यावर सकारात्मक चर्चा केली. यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख राम कदम, कैलास बांगर, वसमत तालुकाप्रमुख राजू चापके, आदी मान्यवर उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा