गुरुकुल व महाविद्यालय चालविणारी अखेर शिक्षिका निलंबित
महाराष्ट्र 24न्यूज नेटवर्क
04 नोव्हेंबर 2023
हिंगोली : शिक्षण विभागाच्या सेवेत
असताना या विभागाची परवानगी न होता गुरुकुल महाविद्यालय चालक मान्यता एका ठिकाणी व वेगळ्याच ठिकाणी चालविणे एका शिक्षिकेच्या अंगलट आले. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या शिक्षिकेच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत.
प्रशालेत कार्यरत शिक्षिका सारिका सुदाम घुगे यांच्याविरुद्ध शिक्षण विभागाकडे तक्रार आली होती. त्यानुसार चौकशी केली तेव्हा त्यांच्यामार्फत चालविण्यात येणाऱ्या रवींद्रनाथ गुरुकुल निवासी वसतिगृहात ४९ विद्यार्थी आढळले. ते वेगवेगळ्या कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. तर सारिका यांच्यासह त्यांचे पती प्राध्यापक संजय चाटे हे दोघेही
जिल्हापरिषद हिंगोली
मुख्यालयी राहतात. वेगवेगळे राहतात व दोघेही घरभाडे उचलतात, हे संयुक्तिक वाटत नसल्याचे म्हटले. तर हिंगोली येथील जि.प. बहुविध वसतिगृहात पंचवीस हजार, वीस हजार, पंधरा हजार असे शुल्क विद्यार्थ्यांना आकारले जाते. शिवाय या भाजपा दाम्पत्याचेच कळमनुरी तालुक्यातील वाकोडी येथे चालविण्याची मंजुरी असताना रवींद्रनाथ टागोर कला महाविद्यालय बाभळी गावात चालविले जाते. बाभळी केंद्रीय शाळेसमोरच दोन शटरच्या खोल्यांमध्ये ते चालते. येथे बारावीतील १७ मुले व तीन शिक्षक चौकशीच्या काळात होते. शाळेत विविध प्रकारचे रेकॉर्डही
नव्हते. याबाबत जि.प.च्या शिक्षण विभागासह इतर गटशिक्षणाधिकाऱ्यांकडूनही चौकशी
केली. यातील अहवालानुसार शिक्षिका सारिका यांना सेवा नियम (शिस्त व अपील) नियम १९६४ चे नियम 3 व पोटकलम २ प्रमाणे जि.प. सेवेतून निलंबित करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काढले. तर निलंबन काळात मुख्यालय सेनगाव हे देण्यात आले आहे.
भाजपा
जिल्हा महिला उपाध्यक्षा मंगलाताई गजानन कुटे यांच्यासह महिला पदाधिकारी यांनी २ ऑक्टोबर रोजी उपोषणालाही बसल्या होत्या. तेव्हा कारवाईचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. मागील अनेक वर्षांपासून याबाबतच्या तक्रारी करण्यात येत असून यामध्ये अखेर ही कारवाई झाली आहे
या करवाई मुळे अनेक शिक्षकांची घाबरगुंडी उडाली आहे
टिप्पणी पोस्ट करा