दिवाळीला गावाकडे जाताय पोलिसांना माहिती दिली का? विकास पाटील
6 नोव्हेंबर 2023
महाराष्ट्र 24न्यूज नेटवर्क
हिंगोली: दिवाळी सणानिमित्त गावी जात असताना दागिने, पैसे आदी मौल्यवान वस्तू घरी न ठेवता बँकेच्या लॉकरमध्ये ठेवावेत. घराला चांगल्या प्रतीचे कुलूप लावावे, असे आवाहन हिंगोली शहराचे पोलिस निरीक्षक व्ही. एस. पाटील यांनी केले आहे.
शालेय विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्या लागल्या आहेत. त्यामुळे शहरात नोकरी वा कामानिमित्त आलेले अनेकजण आतापासूनच गावाकडे परत जात आहेत. घरी कोणी नसल्याचे पाहून चोरटे घरफोडी करण्याची शक्यता असते. त्यामुळे गावी जात असताना घरातील मौल्यवान वस्तू
दागिने बँकेत लॉकरमध्ये ठेवावेत अथवा सोबत घेऊन जावेत. शेजारी व पोलिस ठाण्यातही कल्पना द्यावी. शक्य असल्यास कॉलनीतील ३ ते ४ जणांनी मिळून सुरक्षा रक्षक नेमावा. घरातील परिसरातील लाईट सुरू ठेवावेत. रात्रगस्तीवरील पोलिस कर्मचाऱ्यांचा मोबाइल नंबर घेऊन ठेवावा.
कॉलनी किंवा परिसरात संशयितरित्या कोणी फिरत असल्याचे आढळून आल्यास तत्काळ डायल ११२ वर संपर्क साधावा. कॉलनीत येणाऱ्या फेरीवाले, किरकोळ विक्रेत्यांचे आधार कार्ड तपासावे, असे आवाहनही पाटील यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा