हिंगोलीत संविधान दिनानिमित्त भव्यदिव्य मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर

 हिंगोलीत संविधान दिनानिमित्त भव्यदिव्य मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर

महाराष्ट्र 24 न्यूज  नेटवर्क
25 नोव्हेंबर 2023
26 ऑक्टोबर रोजी शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळा परिसरात संविधान दिनानिमित्त भव्य मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. 
या कार्यक्रमाचे उद्घाटन  डॉ बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळा समिती चे अध्यक्ष मधुकर मांजरमकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी  डॉ.दिपक मोरे, डॉ.प्रतिभा दिपक मोरे,प्रितम सरकटे, दिपक मांजरमकर , उपस्थित राहणार आहेत. 
या आरोग्य तपासणी शिबिरात ई.  सी.जी. मधुमेह, रक्तदाब आदींची तपासणी करण्यात येणार आहे. या आरोग्य तपासणी शिबिरासाठी डॉ.संजय नाकाडे, डॉ.यशवंत पवार, डॉ.राम मुंढे, डॉ.महारुद्र भोसले, डॉ.जगन्नाथ जारे, डॉ. अयोध्या जारे, डॉ नितीन अग्रवाल, डॉ. निलेश आंधेरीकर, डॉ. प्रणिती येस्के, डॉ रमेश ढाकरे, डॉ. अक्षय बंड आदींची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन प्रितम सरकटे सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आले आहे. या आरोग्य तपासणी शिबिरात जास्तीत जास्त लोकांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी. असे आवाहन  प्रितम सरकटे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने