हिंगोली जिल्ह्यातील अव्वल कारकून, मंडळ अधिकाऱ्यांची नायब तहसीलदारपदी पदोन्नती

 हिंगोली जिल्ह्यातील अव्वल कारकून, मंडळ अधिकाऱ्यांची नायब तहसीलदारपदी पदोन्नती

महाराष्ट्र24 न्यूज नेटवर्क
11 नोव्हेंबर 2023

हिंगोली महसूल प्रशासनातील अव्वल कारकून व मंडळ अधिकाऱ्यांना ऐन दिवाळीत आनंदाची गोड बातमी मिळाली. ज्यामध्ये नायब तहसीलदार संवर्गात नियमित पदोन्नती कोट्यातील रिक्त पदे तसेच सरळ सेवेच्या कोट्यातील पदावर पदोन्नतीने स्थापना करण्यात आली आहे. नायब तहसीलदारपदी पदोन्नती झालेल्या कर्मचाऱ्यात जिल्ह्यातील चौघांचा समावेश आहे: या संदर्भात १० नोव्हेंबरला महसूल व
 ऐन दिवाळीत पदोन्नतीची अनेकांना मिळाली गोड बातमी जिल्ह्यातील चौघांचा पदोन्नतीत समावेश शासनाच्या महसूल व वनविभागाने काढला आदेश

वनविभागाने आदेश काढले.

छत्रपती संभाजी नगर विभागातील अव्वल कारकून व मंडळ अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांना नायब तहसीलदार या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. सेवा ज्येष्ठतेनुसार नियमित पदोन्नतीसाठी पात्र ठरलेल्या कर्मचाऱ्यांची पदोन्नती झाली आहे. हिंगोली जिल्ह्यात अव्वल कारकून या पदावर कार्यरत

असलेल्या चार जणांची पदोन्नती झाली आहे. पदोन्नती प्राप्त कर्मचाऱ्यांना पदस्थापनेचे ठिकाण देण्यात आले आहे. ए. एच. सरोदे सेनगाव तहसील कार्यालय, एम.एस. खंदारे तहसील कार्यालय हिंगोली, एम. एस. बडे, ए. एम. सुळे तहसील कार्यालय कळमनुरी या चौघांची नायब तहसीलदारपदी पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने