हिंगोलीत नाथपंथी संघर्ष समितीचा जिल्हा कचेरीवर मोर्चा

 हिंगोलीत नाथपंथी संघर्ष समितीचा जिल्हा कचेरीवर मोर्चा

महाराष्ट्र24 न्यूज नेटवर्क
30 नोव्हेंबर 2023
हिंगोली : विविध मागण्यांसाठी नाथपंथी भटक्या समाजाच्या वतीने हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यात महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

नाथपंथी समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, नाथपंथी जमात ही भटक्या प्रवर्गात येते. गोसावी, भराडी, नाथजोगी, डवरी गोसावी, दशनाम गोसावी, नाथबुवा, नाथ संतोषी अशा अनेक पोटजाती नाथ पंथात आहेत. हा समाज सर्वत्र विखुरलेला आहे. त्यामुळे नेमकी लोकसंख्या किती? याचाही अंदाज कुणाला येत नाही. शासन दरबारी अडीच टक्क्याचे आरक्षण या समाजाला मिळाले असले तरीही हा समाज सर्वच बाबतीत मागासलेला आहे. एनटी ब प्रवर्गातील ३८ जातींना १० टक्के आरक्षण द्यावे, रेण्के 
समितीच्या अहवालानुसार अनुसूचित जाती, जमातीत समावेश करावा, आर्थिक मागासलेपण दूर करण्यासाठी गोरक्षनाथ आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, प्रधानमंत्री आवास योजनेत घरकूल बांधण्यासाठी जमिनी द्या, शासकीय नोकऱ्यांचे खाजगीकरण थांबवून आरक्षणाला संरक्षण द्या, एनटी प्रवर्गात इतर जातीची घुसखोरी थांबवा, या समाजाची सतत भटकंती सुरू असते त्यामुळे जातीचे पुरावे मिळत नाहीत, त्यामुळे १९६१ ची अट शिथिल करा, स्वतंत्र वसतिगृहे द्या आदी मागण्या केल्या आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे निवेदन सादर केले. निवेदनावर नाथपंथी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रशांत पवार, संतोष कासार, कामाक्षी सोने, प्रमिला शंकपाळ, जितेंद्र इंगळे, ज्ञानेश सातपुते, दशरथ पवार, विश्वंभर पटवेकर, ब्रह्मदेव घोगरे, राहुल शिंदे, गणपत जाधव.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने