महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
22 डिसेंबर २०२३
अवैध हातभट्टी दारु विक्रीचे सतत गुन्हे करणाऱ्या सराईत महीला गुन्हेगारास एमपीडीए कायदया अंतर्गत एक वर्षा करीता केले स्थानबध्द् मा. पोलीस अधीक्षक, हिंगोली यांनी पाठविलेल्या प्रस्तावानुसार मा. जिल्हाधिकरी हिंगोली यांनी काढले
कार्यवाहीचे आदेश मा. पोलीस अर्थ क्षक, श्री जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्हयाचा पदभार स्विकारल्यानंतर सराईत गुन्हेगारा बाबत एमपीडीए अंतर्गत सलग ३१ वी कार्यवाही.
मा. पोलीस अधीक्षक, श्री जी. श्रीधर हिंगोली यांनी जिल्हयाचा पदभार स्विकारताच जिल्हयातील सराईत गुन्हेगार व सतत गुन्हे करणाऱ्या विरूध्द कडक कार्यवाहीची भूमीका घेउन अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या आरोपीची इत्यंभूत माहिती काढुन ते करत असलेल्या गुन्हयांना प्रतिबंध करण्यासाठी त्याच्या विरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा, फौजदारी प्रकीया संहिता व एमपीडीए कायदया अंतर्गत प्रभावी प्रतीबंधात्मक कार्यवाही केली जात आहे.
धोकादायक महिला नामे लताबाई गनपत काळे वय ३५ वर्ष रा इंदिरानगर हिंगोली ता जि. हिंगोली. यांवेवर मागील अनेक वर्षा पासुन हिंगोली जिल्हयातील पो.स्टे हिंगोली शहर हादीत अवैध हातभट्टी दारु विक्रीचे चे एकूण (१३) गुन्हे दाखल होते. तसेच मदाका ९३ प्रमाणे प्रतिबंधात्मक कार्यवाही करन्यात आली होती तरीही ती सतत गुन्हे करित होती. ती सनाजासाठी धोकादायक बनली होती तिच्या कृत्यामुळे परिसरातील नागरिकां मध्ये असुरक्षीततेची भावना निर्माण झालो होती, तसेच सामाजिक स्वास्थ्यास व सार्वजनिक सुव्येवस्थेस बाधा पोहचविणारी धोकादायक महीला बनली होती म्हणून मा. पोलीस अधीक्षक यांचे आदेशाने सदर प्रकरण पोलीस निरिक्षक नरेंद्र पाडाळकर पो.स्टे हिंगोली शहर यांनी श्री सुरेष दळवी, उप विभागीय पोलीस अधिकारी उपविभाग हिंगोली श यांच्या मार्फतीने नमुद महिली विरूध्द महाराष्ट्र झोपडटटी गुंड, हातभटटीवाले, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, द्रकश्राव्य कलाकृतीचे विना परवाना प्रर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हिडीओ पायरेट्स), वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तुंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यास आळा घालण्याबाबतचा अधिनियम १९८१ (एम.पी.डी.ए) चे कलम ३(१) अन्वये कार्यवाहीचा प्रस्ताव मा. पोलीस अधीक्षक, श्री जी. श्रीधर यांच्या कडे सादर केला होता. मा. पोलीस अधीक्षक, हिंगोली यांनी सदर प्रस्ताव मा. जिल्हाधिकारी हिंगोली यांच्या कडे पाठविला होता.
मा. जिल्हाधिकारी, हिंगोली श्री जितेंद्र पापळकर यांनी सदर प्रस्तावाची सविस्तर पडताळणी करून नमुद धोकादायक महिला नामे लताबाई गनपत काळे वय ३५ वर्ष रा इंदिरानगर हिंगोली ता जि. हिंगोली ही सार्वजनिक सुव्येवस्थेस बाधक ठरून धोकादायक व्यक्ती बनल्यामुळे त्यास एपीडीए १९८१ (सुधारणा १९९६,२००९ आणि २०१५) कलम ३ (२) अन्वये एक वर्षाकरीता कारागृहात स्थानबध्दतेचे आदेश निर्गमीत केले असुन नमुद स्थानबध्द महिलेस ताब्यात घेण्यात आले असुन त्यास परभणी मध्यवर्ती कारागृह, परभणी येथे दाखल करण्याची कार्यवाही चालु आहे.
सदर प्रस्ताव तयार करण्यामध्ये पो.नि श्री विकास पाटील, स्था. गु.शा हिंगोली, प्रतिबंधक कार्यवाही पथक, स्थागुशा हिंगोली, तसेच पो.स्टे हिंगोली शहरचे पो.नि पाडाळकर, पोउपनि कपील आगलावे, पोह अशोक थामने यांनी महत्वाची भुमिका पार पाडली आहे.
टिप्पणी पोस्ट करा