'लक्ष्मी लाईफ केअर' हिंगोली येथे
नवीन वर्षात भव्य आरोग्य शिबिर
महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क
23 डिसेंबर 2023
येथील लक्ष्मी लाईफ केअर
हॉस्पिटलच्या माध्यमातून मागील तीन वर्षापासून हिंगोलीत हॉस्पिटल सुरू आहे. तृतीय वर्धापन दिनानिमित्त १ ते १० जानेवारी दरम्यान आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आंले असून या शिबिरात विविध चाचण्या व शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत. या आरोग्य शिबिराचा रूग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन लक्ष्मी लाईफ केअरचे डॉ.अखिल अग्रवाल, डॉ. मयूर अग्रवाल यांनी केले आहे. -
हिंगोली शहरातील नारायण नगर भागात असलेल्या लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पिटल हिंगोलीच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन
१ ते १० जानेवारी दरम्यान करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांकडून अॅन्जीओग्राफी, हृदयाची सोनोग्राफी, ईसीजी, हृदयरोग संबंधी रक्त तपासणी ही १० हजार रूपयामध्ये केली जाते; परंतु ही तपासणी ३ हजार रूपयामध्ये करण्यात येणार आहे. तसेच ट्रेड मिल चाचणी, हृदयाची सोनोग्राफी, ईसीजी, हृदयरोग संबंधी तपासणी ही ८ हजार रूपयाची तपासणी फक्त २ हजार रूपयामध्ये करण्यात येणार आहे. सीबीसी, ब्लड शुगर लेव्हल, एफ़बीसी आणि पीपीबीएस यासह अनेक चाचण्या हजार रूपयामध्ये केल्या जाणार आहेत. मुतखडा व प्रोस्टेटच्या सर्व शस्त्रक्रिया मोफत, मुळव्याध व भगंदर शस्त्रक्रिया मोफत, एंडोस्कोपी अर्थात पोटाच्या आतड्याची दुबर्णीद्वारे तपासणी फक्त ३ हजार रूपयामध्ये व मोफत अॅन्जीओप्लास्टीची सुविधाही
उपलब्ध आहे. तसेच लवकरच नेत्ररोग विभाग रूग्णाच्या सेवेमध्ये उपलब्ध होणार असल्याचे 'लक्ष्मी' लाईफ केअर' हॉस्पिटलच्यावतीने सांगण्यात आले आहे.
दरम्यान, लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पिटल, नारायणनगरमध्ये ५० बेडचे मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल असून मेडिकल विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, युरोलॉजी विभाग, ट्रामा केअर सेंटर, सर्जरी विभाग, डायलेसीस विभाग, सुसज्ज अति दक्षता विभाग, कॅथलॅब आदी सुविधा ह्या लक्ष्मी केअर हॉस्पिटलमध्ये असून १ ते १० जानेवारी दरम्यान दहा दिवसीय आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचा रूग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पिटलचे डॉ. अखिल अग्रवाल, डॉ. मयूर अग्रवाल . यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा