अपघातात तिहेरी मृत्यू नव्हे खून; मुलगाच निघाला मारेकरी
घरगुती कारणातून घडलेला प्रकार
महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क
15 जानेवारी 2024
हिंगोली
तालुक्यातील डिग्रस वाणी शिवारात झालेल्या अपघातातील तीन जणांच्या मृत्यू प्रकरणात घातपात झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले असून मुलानेच आई, वडिल व भावाचा खून केल्याचे मयत स्पष्ट झाले आहे. घरगुती कारणातून होणाऱ्या विरोधातून त्याने तिघांचा काटा काढल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. बासंबा पोलिसांनी त्यांच्या मुलास अटक केली आहे.
हिंगोली तालुक्यातील डिग्रसवाणी शिवारात गुरुवारी ११ जानेवारी रोजी सकाळी तिघांचा मृतदेह रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यामध्ये आढळून आला. मृतकामध्ये कुंडलीक श्रीपती जाधव (६५), कलावती कुंडलीक जाधव (६०), आकाश कुंडलीक जाधव (२५) या मयतांचा समावेश आहे. यामध्ये कुंडलिक जाधव यांची प्रकृती बरी नसल्यामुळे त्यांना उपचारासाठी त्यांचा मुलगा आकाश हा सिरसम येथे घेऊन जात होता. यावेळी त्याची आई कलावती बाई त्यांच्या सोबत होत्या. डिग्रसवाणी येथून काही
कुंडलिक जाधव, कलावती जाधव व आकाश जाधव अंतरावर असलेल्या एका वळणावर आकाश याला दुचाकीवर नियंत्रण मिळविता आले नाही. त्यामुळे दुचाकी रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्यात पडून तिघांचाही मृत्यू झाल्याचे त्यांचा मुलगा महेंद्र जाधव याने पोलिसांना सांगितले होते. मात्र घटनास्थळावरील परिस्थिती व इतर संशयास्पद बाबी लक्षात घेऊन पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील पोलीस निरीक्षक विकास पाटील यांनी या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश बासंबा पोलिसांना दिले. त्यावरून बासंबा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास चवळी सहायक पोलिस निरीक्षक शिवसाब घेवारे, जमादार नानाराव पोले, खिल्लारे,
बाबुराव धाबे नामदेव हाके शेख उमर
यांच्या पथकाने घटनास्थळी तसेच मयतांच्या घरी जाऊन पाहणी केली. तीनही मयतांच्या घरामध्ये स्वच्छता केलेली
पोलिसांनी या प्रकरणात आरोपी महेंद्र जाधव याची अधिक चौकशी केली असता त्याचे घरगुती कारणातून त्याने कबुल केले. त्या त्याचे वडिल कुंडलीक जाधव, आई कलावती जाधव व भाऊ आकाश जाधव यांचा विरोध होता. त्यामुळे त्यांच्यात नेहमी वाद होत होते. या वादातून त्याने बुधवारी १० जानेवारी रोजी रात्री वडिल व भाऊ यांचा खून केला. त्यानंतर आईला सोबत नेऊन डिग्रसवाणी शिवारात मारले. त्या ठिकाणी तिघांनाही दुचाकीसह फेकून देत अपघाताचा बनाव केल्याचे पोलिसांनी सांगितले.
दिसून आल्याने पोलिसांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. पोलिसांनी मयत जाधव दांम्पत्याचा मुलगा महेंद्र यास चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली असता त्याने तिघांचा खून करून डिग्रसवाणी शिवारात टाकून दिले व अपघाताचा बनाव केल्याचे चौकशीमध्ये सांगितले आहे. पोलिसांनी १४ जानेवारी रोजी सायंकाळी त्यास अटक केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा