तलाठी मारहाण प्रकरणातील आरोपी ज्ञानेश्वर पतंगेला तीन दिवसाची पोलीस कोठडी

तलाठी मारहाण प्रकरणातील आरोपी ज्ञानेश्वर पतंगेला  तीन दिवसाची पोलीस कोठडी

महाराष्ट्र 24न्यूज नेटवर्क
27 फेब्रुवारी 2024

कळमनुरी वाळू माफिया कडून तलाठ्यास मारहाण प्रकरणानंतर तलाठी कर्मचारी संघटनेकडून आरोपीला अटक करावी या मागणी करिता आंदोलन करण्याचा दिलेला इशारा व घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस प्रशासनाने मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपीस २५ फेब्रुवारी रोजी वसमत तालुक्यामधून रात्री ताब्यात घेतले. २६ फेब्रुवारीला आरोपीस न्यायालयात उभे केले, असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
कळमनुरी तालुक्यातील कोंदुर दिग्रस परिसरामधून वाहणाऱ्या कयाधू नदीपात्रातून अनाधिकृतपणे वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला थांबवून रॉयल्टी व कागदपत्रासंदर्भात माहिती मागणाऱ्या तलाठी जगदीश कुलकर्णी व कोतवाल राजू बाभुळकर यांना शुक्रवार २३ फेब्रुवारी

 कळमनुरी तालुक्यातील चिंचोडी शिवारात तलाठी व कोतवास वाळु माफीयाकडुन जीवे मारण्याचा झाला होता प्रयत्न
आरोपीस तीन दिवसाची पोलिस कोठडी
रोजीच्या रात्री चिंचोर्डी येथे वाळू माफियाकडून बेदम मारहाण करून ट्रॅक्टरच्या चाकाखाली टाकण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणात कुलकर्णी यांच्या तक्रारीवरून चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला.

या घटनेनंतर २४ फेब्रुवारी शनिवारी महाराष्ट्र राज्य तलाठी कर्मचारी संघटनेच्या वतीने घटनेचा निषेध करून या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करावी, अन्यथा महाराष्ट्र राज्य तलाठी कर्मचारी संघटनेच्या वतीने काळ्या फीती लावून कामकाज

करण्याचा व गौण खनिज कार्यवाही करण्याच्या कामावर बहिष्काराचा इशारा तहसीलदारांना दिलेल्या निवेदनामध्ये दिला होता. दुसऱ्या बाजूला घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी प्रयत्न चालवले होते. तलाठी मारहाण प्रकरणातील आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांची पथकही स्थापन केली होती. दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी ज्ञानेश्वरं पतंगे यास सहाय्यक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, उपनिरीक्षक गजानन कांगणे, कर्मचारी प्रशांत शिंदे, गुलाब जाधव यांच्या पथकाने शनिवारी रात्रीच्या सुमारास वसमत तालुक्यातील चोंडी आंबा जवळील कवठा पाटी येथून ताब्यात घेतले. त्यास २६ फेब्रुवारी रोजी न्यायालयात उभे केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी दिली असल्याची माहिती साहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनपाडा यांनी  सांगितले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने