हिंगोली जिल्हा भूकंपाने हादरला 4.5 नोंद नागरिकांनी घाबरून जाऊ नये जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

हिंगोली जिल्हा भूकंपाने हादरला 4.5 नोंद 
नागरिकांनी घाबरून जाऊ नये जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर 

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
10 जुलै 2024
आज दि. 10 जुलै 2024 रोजी हिंगोली शहर व हिंगोली सर्वच तालुक्यातून सकाळी 07:14 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले असून या भूकंपची तीव्रता रिष्टर स्केल वर 4.5 नोंदविण्यात आलेली आहे. भूकंपचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावात असून नांदेड व परभणी जिल्ह्यात या भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे. जिल्ह्यात जाणवलेले धक्के सौम्य स्वरूपाचे असून कुठेही नुकसान झालेले नाही. तरी नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे. तसेच गावात ज्या लोकांच्या घराचे छत पत्र्याचे आहे व त्यांनी पत्र्यावर आधारासाठी दगड ठेवले आहेत त्यांनी त्वरित दगड काढून घ्यावेत. असे आवाहन मा. जिल्हाधिकारी  जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने