महिलेच्या विनयभंग प्रकरणी तंटामुक्ती अध्यक्षावर विनयभंगाचा गुन्हा
महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क
16जुलै2024
हिंगोलीः औंढा नागनाथ तालुक्यात अंगणवाडीजवळ एका ३४ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याने महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष जगन्नाथ पौले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, औंढा नागनाथ तालुक्यात महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष जगन्नाथ यादवराव पोले यांनी १५ जुलै रोजी सकाळी
९.४५ च्या सुमारास अंगणवाडीजवळ एका महिलेचा हात धरून तिचा विनयभंग केला. या प्रकरणात महिलेने औंढा नागनाथ पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष जगन्नाथ यादवराव पोले यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक गणपत राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली रवीकांत हरकाळ हे करीत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा