चाकुचा धाक दाखवुन जबरीने कार चोरणाऱ्या चोरटयास ठोकल्या बेडया अकोला येथील ३ कार चोरल्याचे उघड



चाकुचा धाक दाखवुन जबरीने कार  चोरटयास ठोकल्या बेडया 
 अकोला येथील ३ कार  चोरल्याचे उघड 
महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क 
06जुलै2024

घटनेची सविस्तर माहिती अशी की
दिनांक ०१/०७/२०२४ रोजी पो.स्टे. वसमत ग्रामीण हद्दीत अज्ञात दोन चोरटयांनी फिर्यादीची महिंद्रा कार खरेदी करण्याच्या बहाण्याने ट्रायल मारण्यासाठी शहराबाहेर नेवुन फिर्यादीस गळयाला चाकु लावुन गाडीच्या खाली ढकलुन देवुन फिर्यादीची कार जबरीने चोरून नेल्या संदर्भाने पो.स्टे. वसमत ग्रामीण गुरनं. १७७/२०२४ कलम ३०९ (४) (३) (५) भारतीय व्याय संहिता २०२३ अन्वये गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे व्यापारी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन पोलीस अधीक्षक श्री.जी. श्रीधर यांनी सदर गुन्हा तात्काळ उघड करण्याच्या सुचना स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. श्री विकास पाटील यांना देवुन सपोनि. श्री शिवसांब घेवारे यांचे पथक समांतर तपास करीता होते.
त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे तपास पथकास गोपनिय माहिती मिळाली की, सदरचे चोरटे हे अकोला जिल्हयातील असुन त्यांची नावे १) सोहेल खान परवेज खान, वय २० वर्ष, रा. मेमनपुरा, दिपक चौक, अकोला, २) मोहमद अफजल मोहमद मैमन, वय २३ वर्ष, रा. लकडगंज फिरदोस कॉलनी, अकोला, ह.मु. रिसालाबाजार, हिंगोली, ३) शेख महेबुब शेख अन्सार, वय २० वर्ष व ४) आवेस खान युसुफ खान, वय २० वर्ष, दोन्ही रा. खैर मोहम्मद शबनम नगर, अकोला असे असुन ते सध्या जबरीने चोरलेली कार विक्री करण्यासाठी नागपुर येथे गेले असल्याचे समजले. त्यावरून पोलीस पथकाने नागपुर येथुन आरोपी क. ३ व ४ यांना ताब्यात घेतले असता इतर दोन आरोपीतांनी कार घेवुन राजस्थानला पळून गेल्याचे समजले. त्यावरून पोलीस पथकाने तात्काळ आरोपीच्या मागे जावुन मध्यप्रदेश मधील रतलाम जिल्हयातुन उर्वरीत आरोपी क. १ व २ यांना जबरी चोरीतील कारसह ताब्यात घेवुन जबरीने चोरलेली कार क. MH 38 AD 6595 महिंद्रा XUV 300 किं. 3. ६,००,०००/- रू किंमतीची व गुन्हयात वापरलेले मोबाईल ४०,०००/- रू असा एकुण ६,४०,०००/- रुं चा मुद्देमाल जप्त केला. गुन्हा घडताच तपास पथकाने सलग ४८ तासात २००० कि. मी. चा प्रवास करून जबरी चोरी करणारे चोरटे व चोरी केलेली कार ताब्यात घेतली आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री जी. श्रीधर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, पो.नि. श्री विकास पाटील, सपोनि. राजेश मलपिलु, स्था. गु.शा. यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे स.पो.नि.श्री. शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार नितीन गोरे, आकाश टापरे, नरेंद्र साळवे, आजम प्यारेवाले, हरिभाऊ गुंजकर, दत्ता नागरे यांनी केली आहे.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने