हिंगोलीच्या जागेसाठी संभाजी ब्रिगेडचे मनोज आखरे मैदानात
महाराष्ट्र24 न्यूज नेटवर्क
10 ऑगस्ट 2024
हिंगोली : महाविकास आघाडीतील
शिवसेना (उबाठा) च्या कोट्यातून - संभाजी ब्रिगेडने काही जागा मागितल्या असून, त्यात हिंगोली विधानसभेच्या जागेवर प्राधान्याने दावा केला आहे, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे पक्षाध्यक्ष अॅड. मनोज आखरे यांनी दिली.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अॅड. आखरे यांनी ९ ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. यावेळी संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष सुधीर देशमुख यांचीही उपस्थिती होती. अॅड. आखरे म्हणाले, शिवसेना (उबाठा) पक्षासोबत संभाजी ब्रिगेडची युती आहे. लोकसभा निवडणुकीत संभाजी ब्रिगेडने शिवसेनेच्या उमेदवारांसाठी काम केले.
त्यावेळी कोणत्याही जागेसाठी अट्टहास केला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीला फायदा झाला आहे. विधानसभेमध्ये आपल्या विचारांचे, आपले प्रश्न मांडणारे उमेदवार असले पाहिजेत, त्यामुळे संभाजी ब्रिगेडने काही जागा मागितल्या आहेत.
त्यातही हिंगोलीच्या जागेसाठी
संभाजी ब्रिगेड आग्रही आहे. हिंगोलीची जागा संभाजी ब्रिगेडसाठी सुटली तर. आपण स्वतः येथील निवडणूक लढविण्यासाठी तयार आहोत. या जागांच्या अनुषंगाने एक बैठक झाली आहे.
सोमवारी मुंबईत आणखी एक बैठक होणार आहे. त्यात याविषयी चर्चा होईल, असे अॅड. मनोज आखरे यांनी महाराष्ट्र 24 न्यूज ला बोलताना सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा