लाडक्या बहिणीला पुन्हा मिळणार 3 हजार रूपयेउपमुख्यमंत्री अजित

लाडक्या बहिणीला पुन्हा मिळणार 3 हजार रूपये
उपमुख्यमंत्री अजित

2 ऑक्टोंबर 2024 
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
बीड : महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी राज्यात विधानसभा निवडणुकीच्या घोषणा होऊ शकतात. त्याची सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार तयारीही करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून

मतदारसंघात सभा घेतल्या जात आहेत. बीडमध्ये मंगळवार दि. १ ऑक्टोबर रोजी अजित पवार यांनी लाडक्या बहीण योजनासंदर्भा मोठं वक्तव्य केले. आचारसंहिता लागण्यापूर्वीच ३ हजार रूपये बहिणीच्या खात्यावर पडतील असे सांगितले. माजलगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस जनसन्मान यात्रा
आली होती. यानिमित्ताने आयोजित मेळाव्यात अजितदादा पवार बोलत होते. व्यासपिठावर राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे, आ. प्रकाश सोळंके, आ. काळे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. पुढे बोलतांना अजित पवार म्हणाले की, आचारसंहिता लागण्यापूर्वी लाडक्या बहिणींना भाऊबीज म्हणून तीन हजार रुपये देणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने