आमदार बांगर विमानाने हैदराबाद वरून मुंबईला तातडीने रवाना मंत्री मंडळात वर्णी लागण्याची दाट शक्यता


आमदार बांगर विमानाने  हैदराबाद वरून मुंबईला तातडीने  रवाना मंत्री मंडळात वर्णी लागण्याची  दाट शक्यता 
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
24 नोव्हेंबर 2024
आमदार संतोष बांगर यांना
तातडीने मुंबईला बोलावलेः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठविले खाजगी विमान, मंत्रिमंडळात समावेश होण्याची दाट शक्यता आहे 

सविस्तर माहिती अशी की 
कळमनुरीचे आमदार संतोष बांगर
यांना तातडीने मुंबईला येण्याचे आदेश मिळाले असून त्यांना घेऊन जाण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हैदराबाद येथे खाजगी विमान पाठविले आहे. आज रविवारी   सायंकाळी ते मुंबईकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे त्यांना मंत्रीपद मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आमदार म्हणून आमदार संतोष बांगर यांची ओळख आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार बांगर यांनी एकहाती विजय मिळविला.

त्यांच्या पराभवासाठी महाविकास आघाडीच्या नेते व कार्यकर्त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले होते. मात्र आमदार बांगर यांनी महायुतीच्या सर्व सामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन निवडणुक लढविली अन जिंकूनही दाखवली आहे.

हिंगोली येथे शनिवारी ता. २३ झालेल्या मारहाणीमध्ये आमदार बांगर यांचे पुतणे गौरव बांगर यांना पोटात गोळी लागली. गौरव यांच्यावर हैदराबाद येथे रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांच्या देखभालीसाठी आमदार बांगर यांच्यासह त्यांचे कुटुंबिय हैदराबाद
दरम्यान, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने मुंबई येथे पोहोचण्याचे आदेश आमदार बांगर यांना दिले असून त्यांना हैदराबाद येथून मुंबईला येण्यासाठी खाजगी विमानही पाठविले आहे. दुपारी खाजगी विमान हैदराबाद विमानतळावर पोहोचले. त्यानंतर सायंकाळीच आमदार बांगर मुंबईला रवाना झाले आहेत. त्यांना तातडीने मुंबईला येण्याचा आदेश मिळाल्यामुळे आमदार बांगर यांची 
बांगर यांची मंत्रीमंडळात वर्णी लागणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी पुर्वीच आमदार बांगर यांचे भावीमंत्री म्हणून हिंगोली शहरात बॅनर झळकले होते. त्यानंतर आज त्यांना तातडीने मुंबईला बोलावल्यामुळे त्यांच्या मंत्रीपदाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. 
हिंगोली कळमनुरीत  कार्यकर्त्याकडून जल्लोष 




Post a Comment

थोडे नवीन जरा जुने