लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटलच्यावतीने आजपासून 10 जानेवारी पर्यंत आरोग्य शिबीर
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
01 जानेवारी 2025
हिंगोली : शहरातील नारायण नगर भागात असलेल्या लक्ष्मी लाईनकेअर हॉस्पिटलच्या चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबीर १ ते १० जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या शिबीरात विविध चाचण्याची तपासणी केली जाणार असून काही शस्त्रक्रियेमध्ये सुट देवुन मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे. या आरोग्य शिबीराचा रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पिटलचे संचालक अभियंता अशोक अग्रवाल, डॉ. अखिल अग्रवाल यांनी केले आहे.
हिंगोली शहरातील नारायण नगर भागात असलेल्या लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटलच्या चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन
करण्यात आले असून या शिबीरात अॅपेडिक्स व हार्नियाच्या शस्त्रक्रिया मोफत, मुतखडा व प्रोस्टेटेच्या सर्व शस्त्रक्रिया व मुळव्याध व भंगदर शस्त्रक्रिया मोफत, तसेच अँजिओप्लास्टी ची सुविधा मोफत असून एन्डोस्क्रोपी पोटाच्या आजाराची दुर्बीनद्वारे तपासणी फक्त ३ हजार रुपयांमध्ये केली जाणार आहे. तसेच अॅजियोग्राफी, ह्वयांची सोनोग्राफी, ईसीजी, ह्वयरोग संबंधित रक्त तपासणी ही ११ हजाराची तपासणी फक्त २ हजार रुपयांमध्ये केली जाणार आहे. तसेच ट्रेडमिल स्टेट, ह्वयाची सोनोग्राफी, ईसीजी, ह्वयरोग तपासणी ह्या ८ हजाराची असून ती फक्त २ हजार रुपयांमध्ये केली जाणार आहे. यासह इतर तपासण्या या आरोग्य शिबीरात केल्या जाणार असून या हॉस्पिटलमध्ये ५० बेडचे मल्टीस्पेलाटी हॉस्पिटल,
मेडीसन विभाग, अर्थपेडीक विभाग, विरोलाजी विभाग, ड्रामा केअर सेंटर, सर्जरी विभाग, डायलेसीस विभाग, सुसज्ज अतिदक्षता विभाग, कॅथलॅब व आयुष्यमान भारत अंतर्गत मोफत सुविण्धा उपलब्ध, स्टार हेल्थ आदी सुविधा लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल हिंगोली येथे चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त मोफत राहणार आहेत. या संधीचा रुग्णांनी फायदा घ्यावा असे आवाहन अभियंता अशोक अग्रवाल, डॉ. अखिल अग्रवाल यांनी केले आहे. तसेच माधव सपाटे मो. नं. ९७६३०४५२६०, श्रीराम मगर ९६८९२१०४२१, ६९१२१०८१०८, राम मुटकुळे ८७८८४५६५९८ यांच्याकडे रुग्णांनी नावे नोंदवावीत असे ही आवाहन करण्यात आले आहे. व लाभ घेण्याचे अवाहन करण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा