शिवजयंती महोत्सव समिती व पत्रकार क्रिकेट संघ आयोजित क्रिकेट लीग मॅच मध्ये पोलीस क्रिकेट संघ विजेता
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
16 फेब्रुवारी 2024
हिंगोली सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती व पत्रकार संघाच्या वतीने शिवजन्मोत्सवानिमित्त शहरातील संत नामदेव पोलिस कवायत मैदानावर दि.११ फेब्रुवारीपासून क्रिकेट लिग मॅचेसचे आयोजन करण्यात आले आहे होते. आज दि.१६ फेब्रुवारी रोजी खेळविण्यात आलेल्या उपान्त्यपूर्व सामन्यांत प्रथम सामना कोरोना योद्धा हिंगोली विरुद्ध महावितरण हिंगोली यांच्यात झाला यामध्ये महावितरण संघाने विजय प्राप्त केला तर अंतिम सामना व्यापारी क्रिकेट संघ व पोलीस क्रिकेट संघ यांच्यात झाला.प्रथम फलंदाजी करताना पोलीस संघाने दहा षटकात ९७ धावा केल्या तर प्रत्युत्तरात व्यापारी संघ केवळ ५७ धावाच करू शकला या मध्ये पोलीस संघाने व्यापारी संघावर ४० धावांनी विजय मिळवला.
यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष तथा माजी आमदार गजाननराव घुगे,माजी नगराध्यक्ष जगजितराज खुराणा, माजी उपनगराध्यक्ष बिरजू यादव, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनिष आखरे, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अँड.उल्हास पाटील, सचिव सागर डांगे,व्यापारी महासंघाचे ज्ञानेश्वर मामडे अबिद अली जहागिदार, काँग्रेसचे जिल्हाप्रवक्ते विलास गोरे, जहीर भाई विटवाले,पवन मुंदडा, सोमाणी,समिती मार्गदर्शक कल्याण देशमुख, नगरपरिषद स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, शिवा घुगे आदींची उपस्थिती होती. या सामन्याचे धावते समालोचन मराठी मधुन गोपालराव सरनायक,प्रदून गिरीकर, सुमित कान्हेड यांनी तर हिंदी मधून राकेश भट्ट यांनी केले,पंच म्हणून इम्रान कालीवाले, दिनकर कागणे, आकाश,तर स्कोरर म्हणून रोमन सय्यद यांनी काम पाहिले.
पत्रकार संघ आयोजित क्रिकेट लिग मॅचेसमध्ये ११ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी या दरम्यान २० संघांनी सहभाग घेतला होता सदरील सामने हे संत नामदेव पोलीस कवायत मैदान हिंगोली या ठिकाणी पार पडले. सदरील सामने यशस्वी करण्यासाठी पत्रकार संघाचे कर्णधार शिवाजी मेटकर, सुनील पाठक, प्रदुघ्न गिरिकर, दिलिप हळदे, गोपालराव सरनायक, विजय पाटील,राकेश भट्ट,प्रसाद आर्विकर, हरपालसिंग सेठी, सुधीर गोगटे,सुधाकर वाढवे,विजय गुंडेकर, सुमित कान्हेड, प्रितम राठोड, मयुर नखाते,रमेश वाबळे, चंद्रमुनी बलखंडे, संतोष आठवले, साबीर यांनी प्रयत्न केले.
टिप्पणी पोस्ट करा