पीकअप- कारची समोरासमोर टक्कर अजिंक्य घुगे जागीच ठार तर दोघे गंभीर जखमी

पीकअप- कारची समोरासमोर टक्कर अजिंक्य घुगे जागीच ठार तर दोघे  गंभीर जखमी

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
11 मार्च 2025 
 हिंगोली ते औंढा नागनाथ
रोडवरील लिंबाळा (मक्ता) जवळ पीकअप- कारची समोरासमोर टक्कर होऊन अजिंक्य घुगे वय 31 वर्ष .जागीच ठार तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना ११ मार्च रोजी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास घडली.
लिंबाळा (मक्ता) भागात कार (एम.एच.२९ बीसी ५३३१) व पीकअप (एम.एच.४६ बीएम ३१३६) या दोन भरधाव वाहनांत समोरासमोर जोरदार टक्कर झाली. या अपघातात अजिंक्य घुगे  ठार तर दोघे गंभीर जखमी झाले. घटनास्थळी संतुक पिंपरी, लिंबाळा येथील ग्रामस्थांनी धाव घेत घटनेची माहिती ग्रामीण ठाण्यात दिली. त्यावरून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत
जखमींना येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या ठिकाणी प्रथमोपचारानंतर खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेप्रकरणी ग्रामीणचे श्याम कुमार डोंगरे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला 

पोलिस ठाण्यात रात्री उशिरा अपघाताची   नोंद घेण्यात आली . दरम्यान, अपघातातील मयत अजिंक्य घुगे   जखमीं दिनेश पोले 
निखिल पराडकर असे कार मधील जखमीचे  नावे आहेत 
  

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने