हिंगोली जिल्ह्यात एडस ग्रस्त वाढले तब्बल नऊ महिन्यांत ७१ एचआयव्ही बाधित

 हिंगोली जिल्ह्यात एडस  ग्रस्त वाढले तब्बल  नऊ महिन्यांत  ७१ एचआयव्ही बाधित

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
27 मार्च 2025 
हिंगोली 
एचआयव्ही एइस कार्यक्रमांतर्गत आरोग्य विभागाने नऊ महिन्यांमध्ये ३३३७६ जणांची तपासणी केली आहे. त्यात ७१ एचआयव्ही संसर्गित रुग्णांची नोंद घेण्यात आली आहे. या रुग्णांवर उपचार केले जात आहेत.

जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी अभिनत गोयल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी यांनी जिल्ह्यातील एचआयव्ही, एइस कार्यक्रमाचा अहवाल सादर केला. त्यात ही माहिती दिली. एप्रिल ते डिसेंबर २०२४ या नऊ महिन्यांत २४६६१ गरोदर महिलांची तपासणी केली असून त्यापैकी ३ नवीन व ९ यापूर्वीच एचआयव्ही संसर्गित रुग्ण आढळले. एचआयव्ही संसर्गित महिलांच्या १० मुलांचे १८ महिन्यानंतरचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आढळले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
 त्यांनी एचआयव्ही 
जिल्हाधिकाऱ्यांकडून  कर्मचारी अधिकाऱ्यांचे कौतुक 
जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी जिल्हा एडस प्रतिबंध व नियंत्रण विभागाच्या कामाची नाराजी व्यक्त केली आहे  जिल्हा एडस प्रतिबंध व नियंत्रण विभागाने एडस आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून कौतुकास्पद कामगिरी केली, असे ते म्हणाले. बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलाश शेळके, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग फोपसे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर.आर. मगर, जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते, डॉ. प्रकाश कोठुळे आदी उपस्थित होते.

सहजीवन जगणाऱ्या व्यक्ती व देहविक्रय करणाऱ्या महिलांना इतर सामाजिक लाभाच्या बाल संगोपन, संजय गांधी निराधार योजना, रेशन कार्ड, बस पास, घरकुल योजना, मतदान कार्ड, आदी योजनांचा लाभ दिला जातआहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने