हिंगोली जिल्ह्यातून पाच गाव गुंड तडीपार पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे
महाराष्ट्र 24 न्यूज नेटव
12 मार्च 2025
हिंगोली. होळी व धुलीवंदनाच्या पूर्वसंध्येला सराईत गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या टोळी विरुध्द मा. पोलीस अधीक्षक हिंगोली यांची कडक कारवाई करत
कलम ५५ महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये ०५ गुन्हेगारांना हिंगोली जिल्हयातुन तडीपार केली आहे
मा. पोलीस अधीक्षक, श्रीकृष्ण कोकाटे यांनी हिंगोली जिल्हयातील सराईत गुन्हेगार व अवेध धंदे चालविणाऱ्या विरुध्द तसेच टोळीने गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या विरुध्द कडक कार्यवाहीची भूमिका असे गुन्हे सराईत करणाऱ्या विरुध्द प्रभावी प्रतिबंध कार्यवाही केली जात आहे.
पोलीस अधीक्षक साहेब, श्री श्रीकृष्ण कोकाटे यांनी आज पो.स्टे. बासंबा व पोस्टे नर्सी नामदेवन हद्दीत राहणारे सराईत गुन्हेगार १) संतोष शंकरराव जाधव वय २३ वर्ष २) सुशिल बबन वाकळे वय २६ वर्ष ३) आशितोष निळकंठ ढाले वय २६ वर्ष सर्व रा बासंबा ता.जि. हिंगोली ४) दिलीप कठाळु काळे वय ४४ वर्ष ५) सुनिल दिलीप काळे वय २० वर्ष दोघे रा. नर्सी नामदेव ता. जि. हिंगोली यांचे विरुध्द पोलीस स्टेशन बासंवा येथे व पोस्टे नसी नामदेव हद्दीत शरीराविरुध्द व मालाविरुध्दचे ०५ गुन्हे दाखल असुन सतत संघटीतपणे गुन्हे करतच आहेत. व त्यांच्या वर्तनात कोणताही बदल होत नसल्याने व त्यांचे अशा गुन्हेगारी प्रवृत्ती व हालचालीमुळे परिसरातील नागरीकांच्या शरीरा विरुद्ध व मालाविरुध्द धोका उत्पन्न होत असल्याने मा. पोलीस अधीक्षक साहेब, हिंगोली यांनी सदर प्रकरणी कडक प्रतिबंध कार्यवाही बाबत आदेश दिल्यावरुन श्री विकास आडे, सहायक पोलीस निरीक्षक, पो.स्टे. बासंबा व श्री सानप, पोलीस निरीक्षक पो.स्टे. नर्सी नामदेव यांनी नमुद आरोपीतां विरुध्द कलम ५५ महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्तावाची प्राथमिक चौकशी श्री सुरेश दळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग हिंगोली ग्रामीण व श्री अंबादास भुसारे उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग हिंगोली शहर यांनी सविस्तर चौकशी करुन नमुद आरोपींच्या टोळीस हिंगोली जिल्हयातुल हद्दपार करणे बाबत मा. पोलीस अधीक्षक, हिंगोली यांचे कडे शिफारस केल्यावरुन नमुद प्रकरणी सविस्तर तपासणी करुन मा. पोलीस अधीक्षक, हिंगोली श्री श्रीकृष्ण कोकाटे यांनी त्यांना प्राप्त महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५५ अन्वये नमुद ०५ आरोपींना हिंगोली जिल्हयातुन हद्दपार केले वावत आदेश काढले आहेत.
मा. पोलीस अधीक्षक, श्री श्रीकृष्ण कोकाटे यांनी समाजात शांतता नांदावी म्हणुन सराईत गुन्हेगारांची माहिती घेवुन त्यांचे बावत कोम्बीन व ऑलआउट ऑपरेशन मधुन त्यांची नियमित तपासणी तसेच त्यांचे बाबत कडक प्रतिबंधक कार्यवाही करीत आहेत. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. श्री विकास पाटील, पोलीस अंमलदार प्रविण क्षीरसागर प्रतिबंधक शाखा हिंगोली यांनी केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा