हिंगोली. राष्ट्रीय पोषण पखवाडा दि. 08 ते 22 एप्रिल 2025 मध्ये हिंगोली जिल्हयाचा राज्यात द्वितिय क्रमांक
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
22 एप्रिल 2025
मा. जिल्हाधिकारी हिंगोली श्री राहुल गुप्ता व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद हिंगोली श्रीमती अंजली रमेश यांचे मार्गदर्शनाखाली हिंगोली जिल्हयाने राष्ट्रीय पोषण पखवाडा माहे एप्रिल 2025 अंतर्गत जन आंदोलन डॅश बोर्डवर ग्रामीण व शहरी विभागातील एकुण 1197 अंगणवाडी केंद्र स्तरावर महिला व बालकल्याण विभागाने आज रोजीपर्यंत 79150 (प्रती अंगणवाडी केंद्र 66.12) उपक्रमांच्या ऑनलाईन नोंदी करुन सदयस्थितीत राज्यात द्वितिय क्रमांकावर आहे. या मध्ये मुलींच्या जन्माचे स्वागत, महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाविषयी जनजागृती, मिशन सक्षम बालिका अंतर्गत बाल विवाह निर्मूलन जनजागृती, ग्राम बाल सरंक्षण समिती स्थापन करणे, किशोरवयीन मुली मेळावे, स्वस्थ बालक बालिका स्पर्धा, बालकांची विशेष स्क्रिनिंग मोहिम, आरोग्य तपासणी शिबीरे, गरोदर माता ओटीभरण, पौष्टीक आहार पाककृती प्रदर्शनी ई. उपक्रम राबविण्यात आलेले आहेत. या साठी महिला व बालकल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गणेश वाघ यांचे नेतृत्त्वाखाली बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री विशाल सिंह चौहान, श्री राजाभाऊ मगर, श्री राजकुमार धापसे, श्रीमती सारीका सोरेकर, श्री विवेककुमार वाकडे, श्रीमती संगिता इंगळे, सर्व पर्यवेक्षिका, सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी पोषण पखवाडयांतर्गत परिश्रम घेतले.
إرسال تعليق