श्री कुलस्वामीनी महिला अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीचे 10 कोटी रुपयाच्या अपहार प्रकरणातील संचालिकांची अटक पूर्व जामीन मंजूर


 श्री कुलस्वामीनी महिला अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीचे 10 कोटी रुपयाच्या अपहार प्रकरणातील संचालिकांची अटक पूर्व जामीन मंजूर 
महाराष्ट्र 24न्यूज  नेटवर्क 
03 एप्रिल 2025
 फसवणूक प्रकरणातील
सविस्तर माहिती अशी की
लेखपाल संजय सिताराम जाजु यांनी दि. 06/12/2023 रोजी पो.स्टेशन हिंगोली शहर येथे लेखी फिर्याद दिली होती कि, श्री कुलस्वामीनी महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सो. लि. या संस्थेच्या संचालक मंडळानी एकुन 4810 ठेविदारांना जास्त परतावा देण्याचे अमीष दाखवून त्यांची एकुण 10,68,41,433 रुपयांची रकमेचा अपहार करून फसवणुक केली आहे.
    तरी अशा आरोपावरून 
पोलीस स्टेशन हिंगोली शहर येथे अपहार  प्रकरणी  गुरनं. 934/2023 कलम 420, 408, 409, 120( ब)भांदवी व सह कलम 3, 4 MPID Act या कायद्या  प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. 
सदर गुन्ह्यामधील आरोपी मीनाक्षी भगवान गुंजकर, अंजु सुधीर कटके, गायत्री गणेश महामुने, वर्षा भारत भुषण अग्रवाल  यांनी  वि उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे अटकपूर्व जामीन साठी अर्ज दाखल केला होता 
तरी दि. 26.03.2025 रोजी वि.न्यायमुर्ती  मा. श्री अरुण पेंडेकर साहेब यांनी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून आरोपींची अटकपूर्व जामीन मंजुर केली.
आरोपींच्या वतीने उच्च न्यायलयाचा  औरगाबाद खंडपिठात वरिष्ठ ॲड सचीन देशमुख, ॲड. निलेश घाणेकर, व ॲड  श्रीकांत कवडे   यांनी बाजु मांडून युक्तीवाद केला व वि. जिल्हा व सत्र न्यायलय हिंगोली येथे  ॲड.अजय (बंटी) पंडितराव देशमुख यांनी काम पाहिले व त्यांना ॲड.शरद देशमुख, ॲड.अदित ऊर्फ शुभम देशमुख  ॲड.राहूल देशमुख, ॲड.विराज देशमुख, ॲड.योगेश खिल्लारी (पाटील), ॲड.अविनाश राठोड ,ॲड.रजत देशमुख, ॲड.प्रकाश मगरे, ॲड.आनंद खिल्लारे, ॲड.मुदस्सीर अ.रहिम, ॲड.सुमित सातव, ॲड.लखन पठाडे, ॲड.श्रध्दा जैस्वाल , ॲड.आकाश चव्हाण, ॲड.शुभम मुदिराज , ॲड.गजानन घुगे, ॲड.सुजित गायकवाड,ॲड.सुमित कदम, ॲड. तुषार पवार ,ॲड. रुपाली खिलारे , ॲड. शेख आदील शेख अजीस यांनी सहकार्य केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने