जिल्ह्याचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करुयात
नूतन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
16 एप्रिल 2025
हिंगोली .केंद्र व राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणीतून जिल्ह्याचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करुयात, असे जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज आढावा बैठकीत सांगितले.
नूतन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज हिंगोली जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हा नियोजन समिती सभागृहामध्ये सर्व विभाग प्रमुखाची आढावा बैठक घेतली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, अपर जिल्हाधिकारी अनिल माचेवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. गुप्ता म्हणाले, शासनाच्या महत्त्वपूर्ण विविध योजनांचा वेळोवेळी आढावा घेण्यात येईल. सर्व योजना राबविण्यासाठी सर्व विभाग प्रमुख यांच्याकडून चांगले काम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
टिप्पणी पोस्ट करा