छेडछाड व मारहाण प्रकरणातील अटकपुर्व जामीन मंजुर



छेडछाड व मारहाण प्रकरणातील  अटकपुर्व जामीन मंजुर

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
18 एप्रिल 2025 
हिंगोली : छेड़छाड़ व
मारहाण प्रकरणातील आरोपीचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने १७ एप्रिल रोजी मंजुर केला आहे. या प्रकरणात अँड जि. के. गायकवाड पाटील यांनी काम पाहिले.

हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उमरा कापसे येथे छेडछाड व मारहाण केल्या प्रकरणी गौतम खडसे, देवकाबाई खडसे, किशोर खडसे यांच्या विरुध्द २१ मार्च रोजी विविध कलमान्वये गुन्हा दाखल
झाला होता. यातीलआरोपींनी अॅड. जी. के. गायकवाड पाटील यांच्या मार्फत जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन साठी २५ मार्च रोजी अर्ज दाखल करून या प्रकरणात सुनावणी १७ एप्रिल रोजी झाली असता दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकूण आरोपीचा अटकपूर्व जामीन मंजुर केला आहे. या प्रकरणात आरोपीच्या वतीने अॅड. जी. के. गायकवाड पाटील यांनी काम पाहिले जर त्यांनाॲड. रविकुमार जाधव, अॅड. परमेश्वर इंगोले, अॅड. टेकाळे यांनी सहकार्य केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने