भावी नवरदेवाचा अपघातात मृत्यूसिंदगी गावावर शौककळा

 भावी नवरदेवाचा  अपघातात मृत्यू
सिंदगी गावावर शौककळा  
 
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
20 एप्रिल 2025 
हिंगोली : कळमनुरी
तालुक्यातील सिंदगी येथील भावी नवरदेव कपडे व इतर साहित्य खरेदीसाठी १८ एप्रिलला मित्रा सोबत गेला होता. नांदेड ते वसमत मार्गावर गिरगाव पाटीजवळ भरधाव वेगातील कारने दुचाकीला धडक दिल्याने भावी नवरदेवाचा मृत्यू झाला असुन अन्य एकजण जखमी झाल्याने रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, कळमनुरी तालुक्यातील सिंदगी येथील विशाल गजानन गवळी (२३) याचा ३० एप्रिल बुधवार रोजी सकाळी १०.४२ मिनिटांनी

सेनगाव
तालुक्यातील पार्डी पोहकर येथे विवाह सोहळा पार पडणार होता. त्या करीता तो आपला मित्र कपील मगर याच्यासोबत कपडे व इतर साहित्य खरेदीकरीता १८ एप्रिलला मोटार सायकलवर नांदेड येथे गेला होता. खरेदी झाल्यानंतर दोघेही रात्री ८ ते ९ च्या सुमारास मोटारसायकल वरून गावाकडे येत असताना वसमत मार्गावर गिरगाव पाटीजवळ वसमतकडून नांदेडकडे जाणाऱ्या भरधाव कारने मोटार सायकलला धडक दिल्याने त्यात विशाल गवळी व कपिल मगर हे दोघेही
गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर वसमत ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे, जमादार मधुकर आडे, विजय उपरे, नामदेव बेगाळ यांनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने दोघांना नांदेड येथे उपचारासाठी रवाना केले. नांदेड येथील डॉक्टरांनी तपासणी केल्यावर विशाल गवळी याचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. गंभीर जखमी कपिलवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. विशालचा मृतदेह या

नांदेड ते वसमत मार्गावर गिरगाव पाटीजवळ अपघात
मयत विशालचा ३० एप्रिलला  होता विवाह सोहळा 
अपघातात मित्र जखमी झाल्याने रुग्णालयात उपचार
शवविच्छेदन केल्यानंतर त्याच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. कळमनुरी तालुक्यातील सिंदगी येथे १९ एप्रिल शनिवार रोजी विशालवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे. दरम्यान या अपघाता बाबत पोलिस ठाण्यात  तक्रार आल्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल असे  पोलिसांनी सांगितले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने