सेनगाव पंचायत समिती 43.77 लाख रुपयाचा अपहार
आरोपी मोकाट
सेनगाव पंचायत समिती गैरव्यवहार बंडाळे. गव्हाणकर. शिंदे .शर्मावर या
कर्मचाऱ्यांवर ४३.७७ लाख रुपयांच्या अपहार
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
15मे2025
सविस्तर माहिती अशी की
गैरव्यवहार केल्या प्रकरणी चौघांवर ४३.७७ लाख रुपयांचा अपहार करून शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी बुधवारी ता. ५ मार्च रोजी सेनगाव पोलिसात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला
हिंगोली जिल्ह्यातील
सेनगाव पंचायत समितीच्या लेखा विभागाने कंत्राटदारांकडून कामगार विमा व इतर रक्कम कपात करून सदर रकमेचे देयक संबंधित विभागाला दिलेच नाही. त्यानंतर देयकाचे धनादेश व त्यासोबतच शेड्यूल लाऊन सदर रक्कम वैयक्तिक खात्यात वर्ग केली होती. या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी नेहा भोसले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिगंबर माडे यांनी चार सदस्यांची
चौकशी समिती स्थापन केली होती. या चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर लेखा विभागातील कर्मचारी नितीन शर्मा याला निलंबीत करण्यात आले आहे. तर नितीन बंडाळे, दत्ता शिंदे, अनिल गव्हाणकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.होती
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात देऊन संबंधितांवर अपहाराचे गुन्हे दाखल करावेत असा अहवाल लेखा विभागाने सादर केला होता. त्यानंतर या प्रकरणात गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी दिल्याने चार कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला
दरम्यान गुन्ह्याचा तपास
हिंगोली आर्थिक गुन्हे शाखेकडे
सोपविण्यात आला
मात्र मागील 5 मार्चपासून हे आरोपी मोकाट असल्याने पोलिसांना अद्याप आरोपीचा शोध लागला नाही
नेमके आरोपी गेले कुठे हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे
एक पथक स्थापन करण्यात आले असून आरोपीच्या शोधासाठी मुंबईच्या दिशेने पथक रवाना झाले आहे
आरोपीला लवकरच
अटक करू असे
अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी महाराष्ट्र24 न्यूजला बोलताना सांगितले
टिप्पणी पोस्ट करा