जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी एमपीडीए कायद्या अंतर्गत सराईत गुन्हेगारास एक वर्षा करीता केले स्थानबध्द
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
28 मे 2025
मा. पोलीस अधीक्षक, हिंगोली यांनी पाठविलेल्या प्रस्ताव नुसार मा. श्री राहुल गुप्ता, जिल्हाधिकारी हिंगोली यांनी काढले कार्यवाहीचे आदेश
सविस्तर माहिती अशी की
मा. पोलीस अधीक्षक, श्री श्रीकृष्ण कोकाटे यांनी हिंगोली जिल्हयाचा पदभार स्विकारल्या नंतर सराईत गुन्हेगारा बाबत
एमपीडीए अंतर्गत सलग दुसरी कार्यवाही.केली आहे
मा. पोलीस अधीक्षक, श्री श्रीकृष्ण कोकाटे यांनी हिंगोली यांनी जिल्हयाचा पदभार स्विकारताच जिल्हयातील सराईत गुन्हेगार व सतत गुन्हे करणाऱ्या विरुध्द कडक कार्यवाहीची भुमिका घेवुन अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या आरोपीची इतंभुत माहिती काढून ते करत असलेल्या गुन्हयांना प्रतिबंध करण्यासाटी त्यांच्या विरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा, भारतीय नागरी सुरक्षा संहिता व एम.पी.डी.ए. कायद्या अंतर्गत प्रभावी प्रतिबंधात्मक कार्यवाही केली जात आहे. धोकादायक इसम नामे श्री नागोराव सुखदेव शिरामे वय २७ वर्ष रा. हनकदरी ता. सेनगाव जि. हिंगोली यांचेवर मागील अनेक वर्षापासुन हिंगोली जिल्हयातील पो.स्टे. हिंगोली शहर, नर्सी नामदेव, आखाडा बाळापुर, सेनगाव जि. हिगोली व आळेगाव फाटा जि. पुणे येथे चोरी, घरफोडी, जबरी चोरी, खुण व फसवणुक अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे शरीराविरुध्दचे व मालाविरूध्दचे एकुण दहा (१०) गुन्हे दाखल असुन तो सतत गुन्हे करीत होता. तो समाजासाठी धोकादायक बनला होता. त्याचे कृत्यामुळे परिसरातील नागरीकांमध्ये भिती व असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. तो गंभीर स्वरुपाचे दखलपात्र गुन्हे करीत असल्याने सामाजिक स्वास्थ्यास व सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा पोहोचविणारा धोकादायक इसम बनला होता. म्हणुन मा. पोलीस अधीक्षक यांचे आदेशाने सदर प्रकरण श्री नरेंद्र पाडळकर, पोलीस निरीक्षक, पो.स्टे. हिंगोली शहर ता.जि. हिंगोली यांनी श्री सुरेश एस. दळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग हिंगोली ग्रामीण पदभार उपविभाग हिंगोली शहर यांच्या मार्फतीने नमुद इसमा विरुध्द महाराष्ट्र झोपडपट्टीगुंड. हातभट्टीवाले, औषधीद्रव्ये विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हिडीओ पायरेट्स), वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यास आळा घालण्या बाबतचा अधिनियम १९८१ (एम.पी.डी.ए.) चे कलम ३ (१) अन्वये कार्यवाहीचा प्रस्ताव मा. पोलीस अधीक्षक, श्री श्रीकृष्ण कोकाटे यांच्या कडे सादर केला होता. मा. पोलीस अधीक्षक, हिंगोली यांनी सदर प्रस्तावाचे अवलोकन करुन अंतिम मंजुरीसाठी मा. जिल्हाधिकारी, हिंगोली यांच्या कडे पाटविला होता.
मा. जिल्हाधिकारी, हिंगोली श्री राहुल गुप्ता यांनी सदर प्रस्तावाची सविस्तर पडताळणी करुन नमुद धोकादायक इसम नामे श्री नागोराव सुखदेव शिरामे वय २७ वर्ष रा. हनकदरी ता. सेनगाव जि. हिंगोली हा सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधक ठरुन धोकादायक व्यक्ती बनल्यामुळे त्यास एम.पी.डी.ए. १९८१ (सुधारणा १९९६,२००९ आणि २०१५) कलम ३ (२) अन्वये एक वर्षाकरीता कारागृहात स्थानबध्दतेचे आदेश निर्गमीत केले असून पुढील कार्यवाही सुरु आहे.
टिप्पणी पोस्ट करा